पिंपरी-चिंचवड

वाहनतळ सुविधेत आचारसंहितेचा अडथळा

CD

भोसरी, ता. २७ ः येथील आळंदी रस्त्यावरील कै. श्री ज्ञानेश्वर (माऊलीदादा) सोपानराव गवळी वाहनतळाचे उद्‍घाटन होऊन सहा महिने उलटले आहेत. यानंतरही ही सुविधा बंदच असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आळंदी रस्त्यावर वाहने दुतर्फा लावण्यात येतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. महापालिकेच्या नगररचना विभागाने वाहनतळाची भाडे निश्चिती केली आहे, मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा प्रसिद्ध करता येत नसल्याचे भूमी जिंदगी विभागाचे म्हणणे आहे.
हा पिंपरी चिंचवड शहरातील पहिला चार मजली वाहनतळ आहे. महापालिकेच्या ‘इ’ प्रभागाच्या स्थापत्य विभागाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वाहनतळाचे काम पूर्ण केले. जुलै महिन्यात उद्‍घाटनानंतर पुढील कार्यवाहीसाठी वाहनतळाचे सप्टेंबर महिन्यात भूमी जिंदगी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर भाड्याने देण्यासाठी वाहनतळ नगररचना विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. प्रत्येक विभागाने या कामात तत्परता दाखवली नसल्याने एक वर्षांनंतरही वाहनतळ सुरू झालेला नाही.
आळंदी रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे, पण रस्त्यावरील पदपथांवर विक्रेते आणि हातगाडी चालकांनी अतिक्रमण केले आहे. मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यावरील जागा त्यामुळे आणखी कमी झाली आहे. पूर्वी सम-विषम पार्किंगचे नियोजन होते. तसे फलकही लावण्यात आले होते, मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. ग्राहक आणि दुकानदारांनी दुकानासमोरील रस्त्यावर दुचाकी आणि चार चाकी वाहने लावली आहेत. त्यामुळे रहदारीत अडथळा येतो. याचा सर्वांनाच त्रास होतो. हा वाहनतळ सुरू झाल्यावर या रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे नियोजन करण्यात येईल, असे भोसरी वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.

दुर्लक्षामुळे कचराकुंडी
वाहनतळ सुरू न झाल्याने त्याची दुरवस्था होऊ लागली आहे. प्रवेशद्वारापाशी आणि तळमजल्यावर कचऱ्याचे ढीग पडले आहेत. तेथे कचराकुंडीच झाली आहे. थंडीपासून वाचण्यासाठी काही जण वाहनतळाच्या भिंतीजवळ कचरा जाळतात. त्यामुळे भिंत काळी झाली आहे. तेथे काही तळीरामांना अड्डा केल्याचे काही नागरिकांनी सांगितले. तळ मजल्यावर मद्याच्या बाटल्या पडलेल्या असतात.
---
महापालिकेच्या नगररचना विभागाने भोसरीतील आळंदी रस्त्यावरील वाहनतळाची भाडेनिश्चिती करून तो प्रस्ताव भूमी जिंदगी विभागाकडे आठ दिवसांपूर्वी पाठविला आहे, मात्र महापालिकेच्या निवडणुकीमुळे निविदा प्रसिद्ध करण्यात येत नाही. आचारसंहितेनंतर निविदा प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर योग्य कार्यवाही करून वाहनतळ सुरू करण्यात येईल
- सीताराम बहुरै, उपायुक्त, भूमी जिंदगी विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
--------

Motor Vehicle Rules: दहा वर्षांची गाडी समजणार जुनी; 'फिटनेस फी' दहा पटींपर्यंत वाढली, केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा!

Indian Railway: सण-उत्सवात रेल्वेचा मोठा हातभार; वर्षभरात ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या!

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु

Mumbai Crime: हिंदी बोलली म्हणून ६ वर्षाच्या चिमुकलीला संपवलं; आईचं निर्दयी कृत्य, पण तपासात वेगळंच सत्य समोर आलं

Loni Kalbhor Crime : सराईत गुन्हेगार सद्दाम अन्सारीवर कडक कारवाई; एमपीडीएअंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध!

SCROLL FOR NEXT