पिंपरी-चिंचवड

साईटपट्ट्या न भरल्याने अपघाताचा धोका

CD

भोसरी, ता. २ ः येथील आळंदी रस्त्यावर बनाचा ओढा ते फुगे वस्ती दरम्यानच्या रस्त्याच्या साइडपट्ट्या न भरल्याने हा रस्ता वाहन चालकांसाठी धोकादायक झाला आहे. त्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या साइडपट्ट्या तातडीने भरण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे.
भोसरीवरून दिघी, वडमुखवाडी, आळंदी, चऱ्होली, बोपखेल, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे आदी परिसरात ये-जा करण्यासाठी भोसरीतील आळंदी रस्ता हा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावर अगोदरच वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने फेरीवाले, हातगाडीवाले यांच्यासह दुकानदारांचाही समावेश आहे.
त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच अनेकदा वाहतूक कोंडीही होत असते. अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद झाला असताना रस्त्याच्या काही भागांतील साइडपट्ट्या धोकादायक ठरत आहेत.
त्या न भरल्याने रस्त्याच्याकडेला काही ठिकाणी एक ते दीड फुटाची चर पडली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक झाला आहे. या रस्त्याची साइडपट्टी तातडीने भरण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.


आळंदी रस्त्यावरील बनाच्या ओढ्याजवळील रस्त्याच्या डांबरीकरणावेळी साइडपट्ट्या भरण्यास जागा मालकांद्वारे विरोध करण्यात आला होता. मात्र, पुन्हा या रस्त्याची पाहणी करून त्या भरण्यात येतील.
- शिवराज वाडकर, कार्यकारी अभियंता (स्थापत्य विभाग), इ क्षेत्रीय कार्यालय

बनाच्या ओढ्याजवळ रस्त्याच्याकडेला मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यावर काही वाहन चालक रस्त्याच्या खाली उतरतात. त्यावेळेस रस्त्याजवळील चरीमध्ये वाहन अडकते. साइडपट्ट्या न भरल्यामुळे वाहने घसरत आहेत. अपघातात वाहन चालक जखमी झाले आहेत.
- बबन शिंदे, वाहन चालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur's New CM : युमनाम खेमचंद सिंह असणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री!, विधिमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड

Baramati News : बारामती दूध संघ व माळेगाव नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचे नामांतर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांना दिले जाणार ओळखपत्र

रोहित पवारांच्या अडचणीत वाढ! सर्वोच्च न्यायालयानेही MCA निवडणुकांवरील स्थगिती ठेवली कायम

Ratanagiri Heritage : अडीच हजार वर्षांचा इतिहास धुळीस; खेडमधील बौद्ध लेणी अनास्थेमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT