spices
spices sakal
पिंपरी-चिंचवड

Spices Adulteration : सावधान ! मसाल्याच्या पदार्थांत वाढतेय भेसळ

अनंत काकडे

चिखली - मसाला पदार्थाचे दर वाढल्याने त्यामध्ये भेसळ करण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. मात्र, हे पदार्थ दररोज लागणाऱ्या गहू- ज्वारी प्रमाणे परिचयाचे नसल्याने ग्राहकांना मसाल्याच्या पदार्थात भेसळ सहजासहजी समजणे अशक्य असते. परिणामी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होताना दिसत आहे.

सध्या स्पर्धेचे युग आहे. ग्राहक आपल्याकडे आकर्षित व्हावेत, यासाठी कमी दरात आणि चकचकीत माल देण्याची स्पर्धा व्यापारी तसेच कारखानदारांमध्ये चाललेली पहावयास मिळते. स्वस्त देण्याच्या आणि घेण्याच्या प्रकारात ग्राहक भरडला जातो. सध्या जिऱ्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. घाऊक बाजारात पाचशे वीस ते साडेपाचशे रुपये जिऱ्याचा किलोचा दर आहे. तर किरकोळ बाजारात साडेपाचशे ते सहाशे रुपये किलो दराने जिऱ्याची विक्री केली जाते.

दर वाढताच भेसळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. जिऱ्यात तसाच दिसणारा सुवा नावाचा पदार्थ टाकला जातो. त्याचबरोबर जिऱ्याच्या झाडाच्या काड्या व गुळाचे पाणी आणि त्यावर जिरा पावडर चा स्प्रे मारला जातो. हे सर्व मिश्रण एकत्र करून जिऱ्याच्या आकाराच्या साच्यामध्ये टाकून जीरा तयार केला जातो. त्यावर वजन वाढविण्यासाठी सनजीरा पावडरचाही मारा केला जातो. बडीशेपमध्ये जीरा पावडरचा स्प्रे मारला जातो. जिऱ्यामध्ये मिक्स करून हीच बडीशेप जीरा म्हणून विकली जाते.

नागकेशर या मसाल्याच्या पदार्थात नागकेशरसारखे दिसणारे निलगिरी या झाडाचे बी टाकून भेसळ केली जाते. मसाल्याच्या मिरी या पदार्थात मिरीसारखे दिसणारे पपईचे बीज मिक्स करून भेसळ केली जाते. त्यामध्ये तेल मिक्स करून पॉलिश केल्यानंतर मिरी किंवा पपईचे बी यातील फरक ओळखणे सर्वसामान्यांना शक्य होत नाही. उलट चकचकीत मिरी दिसत असल्याने अशाच चकचकीत मालाची ग्राहक खरेदी करतात. चक्रीफुल म्हणून परिचित असलेले बादल फूल या पदार्थात तशाच प्रकारे दिसणारे पातळ सालीचे बीज नसलेले फूल मिक्स करून भेसळ केली जाते. भेसळ करण्यात आलेले फूल काळपट असले तरीही बादल फुलाप्रमाणे विटकरी कलर लावला जातो.

भारतातील ब्लॅकपरी, लालपरी लवंग अतिशय दर्जेदार असते. मात्र भारतातील लवंगेमध्ये श्रीलंकेवरून येणारी कमी दर्जाची कोलंबो जातीची लवंग मिसळली जाते. साध्या तिळाला काळा कलर लावून ते काळे तीळ म्हणूनही महागात विकले जातात. दर वाढल्याने सर्रास भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याने ग्राहकांची मोठी फसवणूक होत आहे. त्याचबरोबर हानिकारक कलर किंवा स्प्रे मारल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.

भेसळ कशी ओळखा

१) भेसळयुक्त जीरा पाण्यात टाकल्यानंतर त्यावर मारलेली पावडर पाण्यात विरघळतो.

२) सुवा मिक्स जीरा खाल्ल्यानंतर तो बेचव लागतो.

३) काळी मिरीमधील भेसळ ओळखताना काळी मिरी ही टणक गुळगुळीत आणि तिखट असते. पपईचे बीज दिसायला खरखरीत चवीला कडवट असते.

४) नागकेशर हे चवीला तिखट असते तर नीलगिरीचे बी बेचव लागते.

५) पॉलिश केलेले बादल फूल पाण्यात टाकताच, त्याचा कलर निघून जातो व ते काळपट दिसते तसेच भेसळयुक्त फूल काटेरी आणि बीज विरहित असते.

६) जावित्रीचे फूल हे पिवळसर आणि जायफळाचा स्वाद देणारे आहे. त्यामध्ये लालसर सुगंधविरहित फुले असल्यास जायपत्रीमध्ये भेसळ असल्याचे समजावे.

‘ग्राहकांना स्वस्त देण्याच्या व अधिक पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी भेसळ वाढली आहे. ज्या ठिकाणाहून मसाल्याची आयात होते, तेथेच ही भेसळ केली जाते.

- रोहित ओझा, मसाल्याचे व्यापारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Yuvraj Singh on Rohit Sharma : 'जीवलग मित्राने वर्ल्डकप जिंकलेला पाहायचेय...' सिक्सर किंगने रोहित शर्माचे केले तोंड भरून कौतुक

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

SCROLL FOR NEXT