पिंपरी-चिंचवड

विजेच्या धक्क्याने दोन युवक गंभीर जखमी

CD

चिंचवड, ता.११ ः मोहननगर येथील श्रीराम अपार्टमेंटसमोरील कर्मवीर भाऊराव पाटील रस्त्यावरील रोहित्रामुळे दोन युवकांना वीजेचा जबरदस्त धक्का बसला. ते दोघेही गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. एवढी गंभीर दुर्घटना घडूनही महावितरणचे अधिकारी-कर्मचारी न फिरकल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. या रोहित्रासह फिडर बॉक्स इतरत्र हलविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मोहननगर येथील श्रीराम अपार्टमेंटसमोर महावितरणचे रोहित्र आणि फिडर बॉक्स आहे. मात्र, तो स्थानिकांसाठी मोठा धोका ठरत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणुकीदरम्यान डीजे सिस्टीमचा काही भाग रोहित्राला लागल्याने प्रवीण कुंटे व सदाशिव चव्हाण हे दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून रहिवाशांनी तातडीने महावितरणकडे तत्काळ सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित रोहित्र रहिवासी इमारतीपासून हाताच्या अंतरावर असल्याने भविष्यातही गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच रस्त्यावरच बसवलेला लाल फिडर बॉक्सलाही वाहने वारंवार धडकतात. त्यामुळे तोही सुरक्षित ठिकाणी हलवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आवश्यक उपाय करा
मोहननगर, रामनगर, दत्तनगर व विद्यानगर परिसरातील धोकादायक रोहित्रे आणि फिडर बॉक्सचे सर्वेक्षण करून त्यांना सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. तसेच परिसरातील झाडे, वेली व कचऱ्याची देखील तत्काळ सफाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मोहननगरमधील कांतीलाल खिंवसरा महापालिका शाळेच्या रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि डीपी बॉक्स अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. या ठिकाणी रात्रीच्यावेळी ठिणग्या उडत असतात. शेजारील इमारतीमधील रहिवासी, दुकानदारांना त्याची खूप भीती वाटत आहे. एवढा मोठा अपघात होऊनसुद्धा महावितरणचे कोणी अधिकारी इथे आले नाही. यावेळेसही महावितरणने दुर्लक्ष केल्यास भविष्यात अजूनही अपघात होण्याची शक्यता आहे.
- कमलेश मुथा, स्थानिक रहिवासी


संबंधित ठिकाणी आमचे अभियंता जाऊन पाहणी करतील. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- अतुल देवकर, कार्यकारी अभियंता, महावितरण भोसरी


CWD25A02020

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Module Exposed: मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पाच राज्यांमध्ये छापे अन् पाच संशयित दहशतवाद्यांनाही अटक!

Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

Latest Marathi News Updates Live : मंगळवेढा पोलिसांनी शोधलेले मोबाईल मालकांच्या ताब्यात

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT