पिंपरी-चिंचवड

‘ईसीए’तर्फे पर्यावरण संवर्धन करणाऱ्यांचा गौरव

CD

चिंचवड, ता.१४ ः चिंचवडमधील सायन्स पार्क येथे ‘एन्व्हायर्न्मेंट कन्सर्वेशन असोसिएशन’ तर्फे पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था, शाळा, महाविद्यालय, हाउसिंग सोसायटी व व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त डॉ. तृप्ती सांडभोर, सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपरिया, संचालक प्रवीण तुपे यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी ईसीएचे विभा गोखले, डॉ. चंद्रशेखर पवार, शरद गुप्ता तसेच अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.
ईसीएच्या वतीने शाडू माती मूर्ती कार्यशाळा, ई-कचरा संकलन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, सौर ऊर्जा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कंपोस्ट खत निर्मिती, कचऱ्यापासून इंधन निर्मिती तसेच वॉटर ए. टी. एम. अशा विविध उपक्रमांतून जनजागृती केली जाते. उपक्रमांना सीएसआर फंड उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांना देखील गौरविण्यात आले.
फर्ग्युसन, आयआयईबीएम, राजर्षी शाहू महाविद्यालय ताथवडे, इंदिरा महाविद्यालय ताथवडे, आयबीएमआर महाविद्यालय आकुर्डी, शिवभूमी विद्यालय सांगवडे, प्राथमिक शाळा बगाडी तसेच महानगरपालिका शाळांसह अनेकांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस यांनी सूत्रसंचालन केले, तर ईसीएच्या अध्यक्ष विनिता दाते यांनी आभार मानले.

Accident News: भीषण अपघात! हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात, ७ जणांचा मृत्यू

Leopard Terror : 'नागराळच्या शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला'; मुक्तसंचारामुळे सीमेवरील गावात भीतीचे वातावरण

Latest Marathi News Updates: काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून दहिसर परिसरात गुंडागर्दी

Arts Centre: बहुतांश कलाकेंद्रांत लावणीच्या नावावर बैठकाच! 'साेलापूर जिल्ह्यातील २६ केंद्रांना कायमस्वरूपी प्रमाणपत्रे'; पोलिसांकडून कारवाई गरजेची

Wrestling Championship: वजन जास्त भरल्याचा पुन्हा एकदा भारतीय कुस्तीपटूला फटका; ऑलिम्पिक पदक विजेता जागतिक स्पर्धेसाठी अपात्र

SCROLL FOR NEXT