पिंपरी-चिंचवड

चिंचवडच्या श्रीधरनगर भागांत अंधार

CD

चिंचवड, ता.१८ ः चिंचवड येथील दर्शन हॉलपासून श्रीधरनगर परिसराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधार पसरत आहे. या रस्त्यावरील बहुतांश पथदिवे झाडांच्या फांद्यांनी वेढले गेले असल्याने त्यांचा प्रकाश रस्त्यावर पडत नाही. काही दिवे बंद पडल्याने गुन्हेगारी वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.
या रस्त्यावरून रात्रीच्यावेळेस महिला, ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थी प्रवास करतात. मात्र, रस्त्यावर अंधार असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: महिलांमध्ये पर्स तसेच सोनसाखळी चोरीसारख्या गुन्ह्यांची भीती वाढली असून अन्य नागरिकांनाही असुरक्षित वाटत आहे.
पथदिव्यांचे योग्यरीत्या देखभाल होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे दिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पडत नाही. त्यासाठी उद्यान विभागाने तातडीने छाटणी करणे आवश्यक आहे.
विद्युत विभागाने बंद पथदिवे तातडीने दुरुस्त करावेत किंवा जादा उजेड असणारे दिवे बसवावेत आणि उद्यान विभागाने झाडांच्या फांद्यांची छाटणी करून रस्त्यावर प्रकाश पडेल, याची खात्री करावी. प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील महिलांकडून होत आहे.

‘‘गेल्या कित्येक दिवसापासून पथदिव्यांचा उजेड रस्त्यावर पडत नाही. झाडांच्या फांद्या देखील अवाढव्य वाढलेल्या आहेत. त्यामुळे परिसरातील महिलांना रस्त्यावरून रात्रीच्यावेळी एकट्याने चालताना असुरक्षित वाटत आहे. तरी विद्युत विभाग यांनी जादा उजेड असणारे दिवे बसवावेत. उद्यान विभाग यांनी तातडीने फांद्यांची छाटणी करावी. रस्ता सुरक्षित करावा.
- निर्मला जगताप, अध्यक्ष, स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान

सध्या शाहूनगरला वृक्ष छाटणीचे काम सुरू आहे. लवकरच संबंधित ठिकाणी सर्व फांद्यांची छाटणी करून सर्व पथदिवे मोकळे केले जातील.
- सिद्धेश्वर कडाळे, उद्यान सहाय्यक, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय

दर्शन हॉल ते कामिनी हॉटेल येथील पथदिव्यांबाबत संबंधित इलेक्ट्रिकल सुपरवायझर यांना पाठवून सर्व माहिती घेऊन त्यावर काम करण्यात येईल.
- नीलेश केदार, उपअभियंता (विद्युत), ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय


CWD25A02076

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

Tamhini Ghat Accident : प्रगतीची भरारी राहिली अर्धवट; अपघातानंतर कोंढवे धावडे, कोपरे परिसरात शोककळा

Latest Marathi News Live Update : तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद

SCROLL FOR NEXT