पिंपरी-चिंचवड

विश्वकर्मा मंदिर ट्रस्टला आदर्श संस्था पुरस्कार

CD

चिंचवड, ता.२८ ः विश्वकर्मा सोशल वेल्फेअर फाउंडेशन ट्रस्टच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळा व विद्यार्थी गुणगौरव नुकताच उत्साहात पार पडला. नाशिक येथील विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट या ९७ वर्षे जुन्या संस्थेला आदर्श सामाजिक संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले.
चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे वरील कार्यक्रम झाला. या सोहळ्यास संत वैश्वकर्मण धर्माधिकारी, विश्वधारण समर्थ सदगुरू महाराज, उज्जैन पिठाधीश्वर यांची उपस्थिती लाभली.
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विश्वकर्मा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये अयोध्या येथील श्री प्रभू रामाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण सरस्वती योगीराज (म्हैसूर),पत्रकार गोरक्षनाथ लांडगे (धुळे), ग्रामसेवक नामदेव हिरवे (मांढरदेव, सातारा) व सामाजिक कार्यकर्ते देविदास गोरे (संगमनेर) यांचा समावेश होता. शिक्षक संदीप राजगुरू, सायकलिंगपटू महेश दाभोलकर यांना विशेष उल्लेखनीय कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी चंद्रपूर येथील इतिहास संशोधक डॉ. चक्रपाणी चोप्पावर यांच्या ‘विश्वकर्मा उपासना’ पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त विवेकानंद सुतार यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले; तर दिलीप सुतार यांनी आभार मानले. या सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी फाउंडेशनचे विश्वस्त प्रकाश दिघे, पांडुरंग सुतार, संगीता सुतार, राजू बारवकर, सुभाष सूर्यवंशी, अध्यक्ष राजाराम दिवेकर, उपाध्यक्ष पांडुरंग सुतार, महिला अध्यक्षा अमृता देगावकर व सर्व सक्रिय सदस्य यांचा मोलाचा वाटा राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Chaitanyanand Saraswati : स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला ५ दिवसांचा पोलिस कोठडी; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा झटका

IND vs PAK Final: ICC ने दंड ठोठावल्यावर सुधारला पाकिस्तानी ओपनर, पण आऊट होताच भडकला अन्...; VIDEO

Balasaheb Thorat: संकटातील बळीराजाला कर्जमाफी द्या : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; सरकारला गांभीर्य नाही

IND vs PAK Final Live: जसप्रीत बुमराहने स्पेल संपवला, आता भारताची वाढणार डोकेदुखी? ८ फलंदाजांसह उतरलेत, कोण उचलणार 'डेथ ओव्हर'चा भार?

Amit Shah: देशातून नक्षलवाद कधी नष्ट होणार? अमित शहांनी मोठी घोषणा करत थेट तारीखच सांगितली, म्हणाले...

SCROLL FOR NEXT