पिंपरी-चिंचवड

दुर्गामाता दौड उत्साहात, शेकडो युवकांचा सहभाग

CD

चिंचवड, ता. ३ : नवरात्रोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे दुर्गामाता दौड यंदाही उत्साहात पार पडली. शहरातीलतरुण, महिला आणि शिवभक्तांनी यात उत्साहाने सहभाग घेतला. यानिमित्त संपूर्ण परिसर देवीचा नामघोष आणि आणि राष्ट्रभक्तीपर गीतांनी दुमदुमून गेला.
महादौडीची सुरुवात वाल्हेकरवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली. सर्व सहभागी भगवे फेटे परिधान करून ‘जय भवानी-जय शिवराय’च्या घोषणांनी वातावरण रंगवले. या वेळी देवीच्या चरणी ‘‘देव, देश आणि धर्मासाठी बळ, शौर्य आणि पराक्रम मिळावा’’ या साठी प्रार्थना करण्यात आली. या महादौडीचा समारोप चिंचवडगाव येथील श्रीमान मोरया गोसावी मंदिर पटांगण येथे झाला. येथे सामुदायिक प्रार्थनेनंतर पारंपरिक शस्त्रपूजन सोहळाही पार पडला. मार्गात नागरिकांनी फुलांची उधळण व जल्लोषपूर्ण स्वागत करत दौडीचे स्वागत केले. यावेळी संपूर्ण वातावरणात भक्ती, देशप्रेम आणि उत्साहाचे सूर दुमदुमले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra E-Bond: कागदी बाँडला रामराम; ई-बाँडची सुरुवात, महायुती सरकारचा मोठा निर्णय, फायदे काय?

Arattai vs WhatsApp: स्वदेशी ॲप ‘Arattai’ कोणत्या बाबतीत आहे ‘WhatsApp’पेक्षा वरचढ!

Vande Bharat Train Accident : दसरा उत्सवावरुन परतणाऱ्या पाच तरुणांना 'वंदे भारत' ची धडक, ४ जणांचा जागीच मृत्यू, १ गंभीर जखमी

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Latest Marathi News Live Update: शिरोडा वेळागर समुद्रात ८ पर्यटक बुडाले, बचाव कार्य सुरू

SCROLL FOR NEXT