चिंचवड, ता.५ ः मद्य विक्रीची दुकाने, हॉटेल्स वगळता राज्यातील अन्य दुकाने २४ तास सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याने व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार ? याकडे व्यापारी वर्गाचे आता लक्ष लागले आहे.
पिंपरी चिंचवड हे झपाट्याने विस्तारलेले आहे. पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरातदेखील मोठमोठे मॉल्स, पंचतारांकित हॉटेल्स, कपड्यांची दुकाने आहेत. लहानमोठे उद्योग असून कामगारांची संख्या देखील लाखोंच्या घरात आहे. शासनाच्या या निर्णयानुसार दुकाने २४ तास उघडी राहिल्यास कर्मचाऱ्यांना आवश्यक वस्तू खरेदीसाठी वेगळी सुटी काढण्याची गरज नाही. कर्मचारी कधीही बाजारात जाऊन हव्या त्या वस्तू खरेदी करू शकतात.
यापूर्वी प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस प्रशासनाकडून दुकाने किती वाजेपर्यंत सुरू ठेवायची ? याबाबत वेगवेगळे निर्णय होत होते. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. नियमांचे पालन करताना अनेकदा व्यापारी, पोलिस व प्रशासनामध्ये वादाची वेळ येत होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड व्यापारी महासंघाने राज्यभर एकसमान नियमावलीची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवड येथे पोलिस आयुक्तालयाच्या भूमिपूजनासाठी आले असताना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे ही मागणी केली होती. तसेच त्यानंतरही राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचीही भेट घेऊन हा मुद्दा पुढे रेटण्यात आला. महासंघासह इतर व्यापारी संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर शासनाने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला.
नवीन धोरणामुळे व्यापाऱ्यांना कोणत्याही वेळेचे बंधन न ठेवता आपली दुकाने २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळेस व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. या शासनाच्या निर्णयाचे पिंपरी चिंचवड व्यापारी महासंघ स्वागत करतो. तसेच त्याची अंमलबजावणीही लवकर व्हावी ही अपेक्षा.
- कमलेश मुथा, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड व्यापारी महासंघ
PNE25V57490
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.