चिंचवड, ता. १४ ः ‘भाषांतर म्हणजे केवळ एका भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेत मांडणे नव्हे, तर विविध संस्कृती, विचारप्रवाह आणि साहित्यिक परंपरांना जोडणारा हा सर्जनशील दुवा आहे,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्था साताराचे सहसचिव व उच्च शिक्षण विभागाचे मान्यवर डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
चिंचवडमधील संभाजीनगर महात्मा फुले महाविद्यालयात येथील मराठी, हिंदी व इंग्रजी विभाग तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भाषा व साहित्यात भाषांतराची भूमिका’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य संजोग वाघेरे-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ऑनलाइन व ऑफलाइन संशोधन जर्नलचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, उपप्राचार्या डॉ. संगीता अहिवळे, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद डॉ. दत्तात्रय हिंगणे, अॅड. सतीश गोरडे व दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते.
गोवा विद्यापीठाच्या डॉ. ममता वेर्लेकर यांनी विशेष आमंत्रित वक्त्या म्हणून व्याख्यान दिले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले होते. त्यांनी अशा राष्ट्रीय परिषदा शैक्षणिक संशोधनासाठी उपयुक्त असल्याचे नमूद केले.
या परिषदेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे दोनशे संशोधन निबंध प्राप्त झाले.या परिषदेत इंग्रजी, मराठी व हिंदी अशा स्वतंत्र सत्रांमध्ये नामवंत अभ्यासकांनी भाषांतरातील संकल्पना, आव्हाने व संधी यावर मार्गदर्शन केले. शोधनिबंध सादरीकरण सत्रांत संशोधकांनी विविध दृष्टिकोन मांडले. समारोप सत्रात सीएसआयआर-एनसीएल पुणे येथील डॉ.स्वाती चड्डा यांनी अनुवाद अभ्यासाच्या वाढत्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
आयोजनासाठी उपप्राचार्या डॉ. कामायनी सुर्वे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे यांच्यासह समन्वयक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.