चिंचवड, ता.२७ ः वीर बाल दिवसाच्या निमित्ताने मोनी बाबा आश्रम परिसरात गुरू गोबिंदसिंगजी आणि त्यांच्या वीर साहिबजाद्यांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी मसाला दूध वाटपाचा उपक्रम राबविला.
साहिबजादे बाबा अजितसिंगजी व बाबा जुजहारसिंगजी यांनी चमकौरच्या लढाईत शौर्य गाजवत बलिदान दिले, तर बाबा जोरावरसिंगजी व बाबा फतेहसिंगजी यांनी सिरहिंद येथे धर्मत्याग नाकारत हौतात्म्य पत्करले.
या उपक्रमात जगमोहन धिंगरा, कमलजित सिंग, जस्मीत सिंग, अमरजीत सिंग आणि भगवंत सिंग यांनी सहभाग नोंदवला.