देहू, ता.२१ : पाऊस उघडला असल्याने देहू परिसरातील नागरिकांनी गोधडी व कपडे धुण्यासाठी इंद्रायणी नदीकाठी गर्दी केली होती.
सोमवारी नवरात्र सुरु होत आहे. त्यामुळे घट बसण्यापुर्वी घरातील स्वच्छता करण्याची महिलांची लगबग सुरु झाली आहे. त्यातच पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे रविवारी सकाळी घरातील गोधडी, चादर धुण्यासाठी संत तुकाराम महाराज देऊळवाडा ते गाथा मंदिरापर्यंत नागरिकांनी घाटावर गर्दी होती.