पिंपरी, ता. ३ ः येथे विजयादशमी आणि संघ शताब्दीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे घोषवाद्यांच्या निनादात पथसंचलन उत्साहात पार पडले. पथसंचलनावेळी मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून तसेच महिलांनी औक्षण करून स्वयंसेवकांचे स्वागत केले. सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात झालेल्या समारोप कार्यक्रमात रा.स्व. संघाचे पुणे जिल्हा महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख सुजित घमंडे यांच्या हस्ते पारंपरिक शस्त्रपूजन करण्यात आले. याप्रसंगी घमंडे म्हणाले की, ‘‘संघाच्या शंभर वर्षांच्या इतिहासात अनेक प्रचारकांनी संघ विस्तारासाठी परिश्रम घेतले, त्याग केला आणि अनेक संकटांना सामोरे गेले. याची जाणीव प्रत्येक स्वयंसेवकाने ठेवणे आवश्यक आहे.’’
---