पिंपरी-चिंचवड

इंदोरीत महिला सक्षमीकरण आरोग्य शिबिराला प्रतिसाद

CD

इंदोरी, ता. १४ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत इंदोरी ग्रामपंचायतीत आयोजित एकल महिला सक्षमीकरण आरोग्य शिबिरात २४२ महिलांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. शिबिरात इंदोरी, सुदुंबरे, सुदवडी आणि जांबवडे येथील महिला सहभागी झाल्या.
शिबिराचे उद्‍घाटन सरपंच शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. शिबिरात एच. बी., रक्तशर्करा, कॅन्सर तपासणी तसेच महिलांचे सर्वसाधारण आजार यांची पाहणी करून आवश्यक औषधे देण्यात आली. महिला संरक्षण अधिकारी प्रकाश बाविस्कर यांनी महिलांसाठी असलेल्या कायदे व विविध योजनांची माहिती दिली. डॉ. वामन गेंगजे यांनी आयुष्यमान भारत कार्ड आणि आरोग्य संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक गट विकास अधिकारी सेवक थोरात यांनी एकल महिलांनी घरगुती उद्योग सुरू करून आर्थिक व सामाजिक उन्नती साधावी, आवडीच्या व्यवसायांसाठी प्रशिक्षण घ्यावे आणि बचत गट स्थापन करावेत, असे आवाहन केले. डॉ. पूनम फल्ले, सत्यवान राजिवडे आणि अर्चना बनसोडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अरुण हुलगे यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य महादेव ढाकणे यांनी केले. आभार जुलेखा शेख यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: बिहार निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या...

Bihar Election Result 2025 Live Updates : मोकामा येथून अनंत सिंह विजयी, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Mumbai News: रसिकप्रेमींसाठी आनंदवार्ता! मुंबईत 'या' ठिकाणी सुरु होणार नवं नाट्यगृह

IPL 2026 Retention: दहा फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंना करणार संघातून बाहेर? कुठे अन् कधी पाहाता येणार लाईव्ह, घ्या जाणून

Nashik Leopard Attack VIDEO : नाशिकमध्ये भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ! ; दोन नागरिकांसह वनविभागाचा कर्मचारी हल्ल्यात जखमी

SCROLL FOR NEXT