पिंपरी-चिंचवड

पूर्व मावळात शेतकऱ्यात पेरणी कामांची लगबग

CD

इंदोरी, ता. १५ ः यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पाऊस सुरू झाल्‍याने खरीप व रब्बी हंगामातील शेती मशागती व पेरणी कामे वेळेत होऊ शकली नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने इंदोरी परिसरात शेतीकामास वेग आला आहे.
अनेकांची रखडलेली सोयाबीन काढणी सुरु आहे. सांगुर्डी, इंदोरी, कान्हेवाडी, कोटेश्वरवाडी, येलवाडी येथे पुखराज बटाटा लागवड सुरु आहे. बटाटा बियाणे महाग असल्याने बटाटा लागवड ही कमीच होणार, असे भागूजी दाभाडे, सुदाम भसे, संजय भेगडे यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे कांद्याच्या रोपांचे नुकसान झाल्याने कांदा लागवड ही कमीच होणार. नंतर लावलेल्या रोपांच्या लागवडीस १५ ते ३० दिवसाचा अवधी आहे, असे सपना चव्हाण, आबासाहेब हिंगे, आबासाहेब काशीद या शेतकऱ्यांनी सांगितले. भात काढणीस वेग आला असून मजूर टंचाईमुळे यांत्रिक वापर वाढला आहे. भात काढणीनंतर बागायती ज्वारी, गहू, हरभरा पेरणी सुरु होईल. ज्वारी बियाणे फुले रेवती, परभणी मोती व सुवर्णा वाणास पसंती तर अजित १०८, १०९, नोव्हेल ५१०, महिको ७०७० व अंकुर केदार या गहू वाणास अधिक पसंती आहे. कोरडवाहू क्षेत्रातील पेरणी पूर्ण झाली आहे. अशी प्रतिक्रिया दिनेश चव्हाण व शंकर उबाळे यांनी व्यक्त केली. खते, औषधे, बियाणे याबाबत अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. म्हणून अधिकृत विक्रेते व शासकीय पोर्टल वरून खरेदी करावी, असे आवाहन इंद्रायणी कृषी सेवा केंद्राचे संचालक गणेश दाभाडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

man riding bike under truck video : याला म्हणतात जीव द्यायची हौस! ; पठ्ठ्यानं ट्राफिकमध्ये अडकलेल्या ट्रक खाली घातली दुचाकी अन् मग ...

लग्नानंतर पहिल्याच दिवशी राजवाडेंच्या घरी खळ्ळ खट्याक! समरही पेचात पडणार; 'वीण दोघातली...' मध्ये असं काय घडणार?

IPL 2026 Retention: कोणत्या संघाने कोणाला केलं रिलीज अन् कोणाला रिटेन, किती उरले पैसे? सर्व १० संघांची संपूर्ण लिस्ट

Navale Bridge Accident: नवले ब्रिजवर वाहनांच्या वेगावर येणार मर्यादा; 'इतका' वेग बंधनकारक, मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना

Latest Marathi Live News Update: दिल्ली बॉम्बस्फोट: पोलिसांनी नूहमधून दोन जणांना ताब्यात घेतले

SCROLL FOR NEXT