पिंपरी-चिंचवड

भंडारा डोंगर पायथ्याला २३ जानेवारीपासून हरिनाम सप्ताह

CD

माघ शुद्ध दशमी सोहळ्यात यंदा संत सोहळाही

भंडारा डोंगर पायथ्याला २३ जानेवारीपासून प्रारंभ; ज्ञानेश्वरी, गाथा पारायण सोहळा

इंदोरी, ता. २३ ः संत तुकाराम महाराज प्रकटदिन व माघ दशमी अनुग्रह दिनानिमित्त श्रीक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थानतर्फे २३ ते ३१ जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व संत महात्म्यांचा उत्सव होणार आहे. दरवर्षी डोंगरावर होणारा हा सोहळा यंदा पायथ्याला सुमारे शंभर एकर क्षेत्रावर होणार आहे, अशी माहिती भंडारा डोंगर ट्र्स्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव सोहळा, संत नामदेव महाराज, संत जनाबाई आदी १४ संतांचा ६७५ वा समाधी सोहळा, संत जनार्दनपंत देशपांडे यांचा ४५० वा संजीवन समाधी सोहळा, संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळा, संत सावता महाराज यांचा ७७५ वा जन्मोत्सव सोहळा व संत नारायण महाराज देहूकर यांचा ३७५ वा जन्मोत्सव सोहळा होईल.

सप्ताहात दररोज काकडा भजन, गाथा व ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी अकरा ते साडेबारा आणि सायंकाळी सहा ते आठ कीर्तन, दुपारी भोजन वनित्यनेमाचे भजन, दुपारी संत चरित्रकथा, रात्री भोजन आणि त्यानंतर जागर होणार आहे. दुपारी साडेतीन ते पाच दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा ज्ञानेश्वर महाराज कदम करणार आहेत. पारायण व्यासपीठ नेतृत्व नाना महाराज तावरे हो करणार आहेत.

या सप्ताहात २३ ते ३० जानेवारी दरम्यान अनुक्रमे बंडातात्या कराडकर, संजय महाराज पाचपोर, ॲड. जयवंत महाराज बोधले, चैतन्य महाराज देगलूरकर, अच्युत महाराज दस्तापूरकर, ज्ञानेश्वर महाराज कदम, केशव महाराज नामदास व ज्ञानेश्वर महाराज कदम यांची कीर्तने होणार आहेत. ३१ जानेवारीला सकाळी ९ ते ११ ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे काल्याचे काल्याचे कीर्तन होणार आहे. २८ रोजी दुपारी एक ते तीन दरम्यान डॉ. भावार्थ देखणे व सहकाऱ्यांचे बहुरूपी भारुड होईल.

देहू ते भंडारा डोंगर दिंडीसोहळा
ता. २२ जानेवारी रोजी दुपारी तीन ते पाच दरम्यान देहू ते भंडारा डोंगर पायथा दिंडी सोहळा निघणार असून, त्यात प्रत्येकी ३७५ धर्म ध्वजधारी, कलशधारी, तुळशीधारी, कीर्तनकार, टाळकरी, मृदंगवादक, ब्रम्हवीणाधारी, चोपदार, तुकाराम नावाच्या व्यक्ती, ७५० ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्ती, प्रत्येकी ६७५ नामदेव व जनाबाई नावाच्या व्यक्तींचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ६ ते ७ शांतिब्रह्म मारोती महाराज कुऱ्हेकर यांचे कीर्तन होणार आहे.

वैशिष्‍ट्य काय
- पाच हजार गाथा वाचक
- कीर्तनाला एक हजार टाळकरी
- ज्ञानेश्वरीतील एका ओवीला एक याप्रमाणे ९०३२ वाचक
- कीर्तनाला २५ मृदंग वादक
- चोवीस तास ज्ञानदेव-तुकाराम भजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाचा ऑनलाईन आढावा

SCROLL FOR NEXT