पिंपरी-चिंचवड

वडाचा मळा चौकातील खड्डा अपघातास कारणीभूत

CD

जाधववाडी, ता. १० ः जाधववाडी परिसरातील वडाचा मळा चौकात महावितरणने पंधरा दिवसांपूर्वी केबल दुरुस्तीचे काम केले. मात्र, काम झाल्यानंतर खोदलेला खड्डा व्यवस्थित न बुजवता फक्त माती टाकण्यात आली. पावसामुळे माती वाहून गेली आणि खड्डा पुन्हा उघडा पडला आहे.
हा खड्डा रस्त्याच्या अगदी मधोमध आहे आणि येथे तीन रस्ते एकत्र येतात. त्यामुळे वाहनधारक आणि पायी चालणाऱ्यांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. ‘महावितरणकडून केबल दुरुस्ती करून जागा नीट न भरता फक्त माती टाकण्यात आली. त्यामुळे खड्डा अधिक धोकादायक बनला आहे, असे रहिवासी सांगतात.
या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. दोन्ही बाजूंनी मोठ्या सोसायट्या आहेत आणि महिलांची, लहान मुलांची ये-जा सुरू असते. याठिकाणी दोन शाळा असून, शेकडो विद्यार्थी पायी जातात. त्यामुळे वाहनचालक अचानक वळवतात तेव्हा अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
वाहनचालक वैभव काळे म्हणाले, ‘‘हा खड्डा रस्त्याच्या दुभाजकाजवळ आहे. आम्ही वाहन वळविताना हा खड्डा मध्ये येतो. त्यामुळे मागच्या वाहनाची धडक बसण्याचा धोका असतो.’’ शुक्रवारी येथे आठवडे बाजार भरतो, तेव्हा वाहनांची गर्दी आणि खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होते.’’ या खड्ड्याची त्वरित दखल घ्यावी आणि तो लवकरात लवकर व्यवस्थित बुजवावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Associated Media Ids: JDW25A00265, JDW25A00264

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर खरंच BCCI चा अध्यक्ष होणार का? मास्टर ब्लास्टरची टीम म्हणते, तुम्ही जे ऐकलं आहे ते...

Latest Marathi News Updates Live : काश्मीरहून दिल्लीला ३६ टन सफरचंद पाठवले जाणार

Manchar News : स्मार्ट मीटरमुळे गरीब शेतमजुरांवर लाखोंचे वीजबिल, आंबेगावात कुटुंब अंधारात

ST Reservation : बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षणासाठी अन्नत्याग उपोषण; भिलदरीत तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली

SCROLL FOR NEXT