पिंपरी-चिंचवड

जाधववाडीत खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात

CD

जाधववाडी, ता.२३ ः जाधववाडी परिसरातील वडाचा मळा ते आहेरवाडी या रस्त्यावर खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महापालिकेकडून खड्डे बुजवण्याच्या नावाखाली फक्त खडी टाकण्याचे काम केले जात आहे. योग्य प्रकारे डांबरीकरण न केल्याने खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
रोज सकाळ-संध्याकाळ या रस्त्यावरून शेकडो नागरिक, शालेय विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी प्रवास करतात. अशा वेळी खड्ड्यांवर टाकलेली खडी अपघाताला आमंत्रण देत आहे. विशेषत: पावसामुळे ही खडी अधिक निसरडी होत असल्याने दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघाताची शक्यता वाढली आहे. दररोज कोणीतरी ना कोणीतरी या खडीवरून घसरतो. शाळेत जाणारी लहान मुलेही धोक्यात आहेत. महापालिकेने तातडीने दर्जेदार डांबरीकरण करावे,
अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

अनेक खड्डे खडी टाकून बुजविले आहेत. मात्र पावसामुळे ही खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यांचे दर्जेदार डांबरीकरण करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा अपघातांच्या जबाबदारीसाठी महापालिका प्रशासनाला जबाबदार धरले जाईल.
- प्रदीप आहेर, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पतीला बोलायची 'पाळीव उंदीर', पत्नीच्या वागण्याला उच्च न्यायालयानं ‘वैवाहिक क्रूरता’ ठरवलं अन्...; प्रकरणाची सर्वत्र चर्चा

Lasalgaon News : एसटी बसला कट मारून चालकाला बेदम मारहाण; हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

Pune Crime : मासेविक्रेत्यांकडून २० कोटींची खंडणी उकळल्याप्रकरणी आंदेकर टोळीविरुद्ध गुन्हा

Nandgaon News : नांदगावकरांचे दहेगाव धरण 'तहानलेलेच'; पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम

GST Reform : जीएसटी कमी होताच वस्तू स्वस्त, पण दुकानदार सवलत देतोय की नाही? कसं कळणार, तक्रार कुठे करणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT