पिंपरी-चिंचवड

कुदळवाडी, जाधववाडीत वीजेचे संकट कायम

CD

जाधववाडी, ता. २५ ः कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरात वारंवार वीज खंडित होण्याचा त्रास अजूनही सुरूच असून त्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभरात अनेकदा वीज गायब होत असल्याने घरगुती कामकाज, लहान उद्योग, व्यावसायिक व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण यावर मोठा परिणाम होत आहे.
वीज खंडित झाल्यामुळे गृहिणींचे दैनंदिन कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत आहे. सकाळी स्वयंपाक करताना अचानक वीज गेल्याने गॅसशेजारी मिक्सर, ग्राइंडर, फ्रीज आदी उपकरणे बंद पडतात. त्यामुळे जेवण तयार करण्यात उशीर होत आहे. गृहिणींबरोबरच नोकरदार महिलांना त्याचा अधिक फटका बसत आहे. सकाळी वीज गेल्यामुळे कपडे धुण्याची मशीन बंद पडते. घरातील कामे अपूर्ण राहतात आणि वेळेत ऑफिसला जाता येत नाही, अशी खंत नोकरदार महिलांनी व्यक्त केली. याशिवाय, लहान मुलांना वेळेत जेवण, दूध देणे किंवा त्यांची काळजी घेणे यातही महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार वीज खंडित झाल्याने फ्रीजमधील अन्नपदार्थ खराब होत आहे.

लघुउद्योजक, व्यापाऱ्यांनाही फटका
वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना सेवा पुरविताना अडथळे निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बिघडत असून संगणक व मोबाईल चार्जिंगची समस्या निर्माण झाली आहे. दिवसभरात वीजपुरवठा ये-जा होत असल्याने संगणक, कार्ड स्वाईप मशीन आणि रेफ्रिजरेटरवरील कामे अडखळतात. ग्राहकांना सेवा पुरविताना मोठे अडथळे येतात. त्यामुळे व्यवसायाचे आर्थिक नुकसान होत आहे, अशी नाराजी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

मुलांचे शैक्षणिक नुकसान
ऑनलाईन क्लासेस दरम्यान अचानक वीज गेल्याने अभ्यास खंडित होतो. लॅपटॉप किंवा मोबाईल चार्जिंग पूर्ण नसल्यास वर्ग अर्धवट सोडावा लागतो, अशी खंत स्थानिक विद्यार्थिनींनी व्यक्त केली. वारंवार वीज जाण्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महावितरणने त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढून उपाययोजना करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thar Stunt Viral Video : धावत्या थारच्या टपावर उभं राहून नाचत होती मुलं; समोरुन ट्रक येताच ड्रायव्हरने ब्रेक मारला अन्... थरारक व्हिडिओ

Pune News : लोकप्रतिनीधींचा दबाव महापालिकेला पडला ३ कोटीला; ठेकेदाराला रक्कम देण्यास स्थायीची मान्यता!

Government Employee: दिल्लीत कर्मचाऱ्यांना मिळणार 'वर्क फ्रॉम होम', सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Latest Marathi News Live Update : जम्मूतील ड्रग माफियांना मोठा धक्का, बिश्नाहमध्ये तस्कराच्या भावाचे घर पाडले

PMC News : चिंधीचा कचरा प्रकल्प ‘कचऱ्यात’; अर्थसंकल्पात तरतूद करण्यावर बंदी!

SCROLL FOR NEXT