पिंपरी-चिंचवड

पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक मूल्ये, परंपरांचा ‘शुभारंभ’

CD

जाधववाडी, ता.२५ ः पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक मूल्ये, परंपरांचा आदर करत जाधववाडीमधील शुभारंभ गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांची वाटचाल सुरू आहे. आपण समाजाचे देणे लागतो या हेतूने अनेक सामाजिक उपक्रमही सोसायटीकडून आयोजित केले जातात. भविष्यात सौर उर्जा प्रकल्प आणि भूजल पुनर्भरण योजना राबविण्याचे सोसायटीच्या विचाराधीन आहे.
देशातील विविध कानाकोपऱ्यांमधून आलेली एकूण १८६ कुटुंबे शुभारंभ गृहनिर्माण सोसायटीमध्ये गुण्यागोविंदाने वास्तव्यास आहेत. सोसायटीच्या आतला परिसर अतिशय हिरवाईने नटला आहे. चारही बाजूने आणि प्रांगणात विविध प्रकारची शोभेची, फळांची आणि सुवासिक फुलांची झाडे लावून परिसर अतिशय हिरवागार ठेवण्यात आला आहे. पर्यावरण संतुलन कसे राखावे ? याचा एक उत्तम आदर्श या सोसायटीने ठेवला आहे.

सण-उत्सवाचा उत्साह
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांची प्रतिमेची परिसरातून मिरवणूक काढली जाते. महिला आणि मुलांच्या ढोल पथकांद्वारे शिवरायांना मानवंदना दिली जाते. गणेशोत्सवात सोसायटीमधील प्रत्येकजण गणराज आणण्यापासून सजावट आणि मिरवणुकीपर्यंत आपले योगदान देतात. या काळात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, खेळ अशा विविध स्पर्धा आयोजन केले जाते. क्लब हाउसमध्ये मुलांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले जाते. महिलांसाठी रांगोळी, संगीत खुर्ची, ज्येष्ठ नागरिकांसाठी भजन स्पर्धा, अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर असतो. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनी ज्येष्ठ नागरिक किंवा माजी सैनिक यांच्या हस्ते झेंडा वंदन केले जाते. महिला आणि लहान मुलांसाठी दहीहंडी आयोजित केली जाते.
कोजागरी पौर्णिमेच्या रात्री महिलांसाठी खाद्यपदार्थ आणि घरगुती उत्पादने विकण्यासाठी स्टॉल लावले जातात. सोसायटीच्या गणपती मंडळाला मागील वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपती समितीतर्फे गणपती सजावट, पर्यावरणपूरक आरास स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

सामाजिक उपक्रमात पुढाकार
सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील अतिवृष्टी बाधितांची सोसायटीतर्फे अनेक सभासदांनी प्रत्यक्ष भेट घेऊन अन्न-धान्य, पुस्तके आणि अनेक संसारोपयोगी वस्तूंचे वाटप केले. तसेच सण-उत्सवात गरीब गरजू महिला, विद्यार्थ्यांना मदत केली जाते. अनेकवेळा रक्तदान शिबिर आयोजन केले जाते.

आरोग्यासाठी विविध उपक्रम
लहान मुलांना अभ्यासाची आणि वाचनाची गोडी लागावी, त्यांना चालू घडामोडींचे ज्ञान व्हावे यासाठी सोसायटीने स्वतःचे वाचनालय उभारले आहे. लहान मुलांसाठी स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी माफक शुल्कात कराटे आणि किक बॉक्सिंगचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. तसेच दररोज येथे लहान मुले, महिला, पुरुष आणि ज्येष्ठांसाठी योगाभ्यास वर्ग सुद्धा चालवले जातात. सोसायटीची स्वतःची व्यायाम शाळा असून अत्याधुनिक व्यायामाची साधनेही उपलब्ध आहेत.

सौरउर्जा, पाणी बचतीकडे लक्ष
सध्या सोसायटीकडे स्वतःचे बोअर आणि स्वतःची विहिरी आहे. त्यामुळे पाण्यासाठी सोसायटी बऱ्यापैकी स्वावलंबी आहे. येत्या काही महिन्यांत वीज बचतीसाठी सौर उर्जेचा वापर करून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन असल्याचे समितीच्या सभासदांनी सांगितले. तसेच पावसाचे वाया जाणारे पाणी अडवून ते बोअर मध्ये किंवा विहिरीमध्ये साठविण्याचे नियोजन आहे.

भविष्यात आम्हाला ‘ग्रीन सोसायटी’ बनवायची आहे. उर्जा बचत, पाणी बचत तसेच प्लॅस्टिकमुक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत.
- प्रियांका चौगुले, अध्यक्षा, शुभारंभ गृहनिर्माण सोसायटी

सामाजिक सलोखा आणि एकोपा आमच्या सोसायटीचे खास वैशिष्ट्य आहे. प्रत्येकांच्या संस्कृतीचा आदर करून आम्ही सगळे सण साजरा करतो. त्यामुळे बंधुभाव आणि एकोपा टिकून आहे.
- अभिजीत मानखैरे, सचिव

आमची सोसायटी म्हणजे एक कुटुंबच आहे, असे आम्ही मानतो. त्यामुळे येथे प्रत्येकाच्या मतांचा आदर केला जातो.

म्हणूनच आमची सोसायटीची समिती ही बिनविरोध निवडून आली आहे. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
- पांडुरंग आहेर, सदस्य

सोसायटीची समिती
प्रियांका आनंद चौगुले (अध्यक्षा), अभिजित मानखैरे (सचिव), केतन भादुले (खजिनदार), पांडुरंग आहेर, दिलीप पाटील, सारंग रामगुडे, पूजा महाजन, संतोष कुबल, सागर देवकर (सर्व सदस्य).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer बरा होतोय...! ICU मधून बाहेर, वाचा काय आहेत नवे अपडेट्स

Aditya Thackeray: वोटचोरी अन् बोगस मतदान...; निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा 'राहुल गांधी पॅटर्न'! मतदार यादीवरून मोठे खुलासे

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Sonika Yadav Video: सात महिन्यांची गर्भवती जिद्दीने उभी राहिली! वेटलिफ्टिंग स्पर्धेत १४५ किलो भार उचलून जिंकले पदक

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SCROLL FOR NEXT