पिंपरी-चिंचवड

पाऊस दमदार; भात, सोयाबीन पीके जोमदार

CD

किवळे, ता.३० : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे हवेली आणि मावळ तालुक्यातील किवळे, मामुर्डी, गहुंजे, सांगवडे परिसरात भात आणि सोयाबीनची पिके जोमदार अवस्थेत आहेत. इंद्रायणी वाणाच्या भाताने चांगली उभारी घेतली आहे.
यंदा मुबलक पावसामुळे शेतीस पोषक वातावरण लाभले असून अनेक शेतकऱ्यांनी बैल, शेती अवजारे आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने भात लागवड पूर्ण केली आहे. साळुंब्रे, गोडुंब्रे, किन्हई, चिंचोली, झेंडेमळा, काळोखेमळा, जाधवमळा, हगवणे मळा या भागांतील भात आणि सोयाबीन पिके तरारली आहेत. त्यामुळे यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा निर्माण झाली आहे, असे शेतकरी विनायक जुनवणे, सुनील चव्हाण आणि साहेबराव राक्षे यांनी सांगितले.
किन्हई गावात यंदा सुमारे २० एकर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. येथील शेतकरी सदाशिव पिंजण, नंदकुमार पिंजण, अनिल पिंजण, विष्णू दिवसे, गणेश पिंजण आदींनी पारंपरिक पद्धतीने लागवड करत शेणखताचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने शेती केली आहे. तर जाधवमळ्यात शेतकरी सुरेश जाधव पाटील यांनी भात लागवडीला प्राधान्य दिले असून मारुती जाधव, संदीप जाधव, अनिल जाधव यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. प्रकाश जाधव यांनी राजमा (घेवडा) पिकाची लागवड केली आहे.


काही भागात दुबार पेरणी
काही ठिकाणी जास्त पावसामुळे सोयाबीन उगवण्यात अडचणी आल्याने ते दुबार पेरावे लागल्याचेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. माळवाडी, सांगवडे परिसरात बहुतेक जमिनी भाडेपट्टा तत्वावर दिल्याने भाताखालील क्षेत्र घटल्याचे सुरेश राक्षे यांनी नमूद केले. जादा पावसामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थितीही काही भागांत निर्माण झाली असून, कृषी विभागाने पश्चिम पट्ट्यास ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी कृष्णा परंडवाल यांनी केली आहे.


किवळे परिसरात अजूनही काही ठिकाणी भात लागवड आणि सोयाबीन पेरणी सुरू आहे. यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना कीटकनाशक व अन्य औषधांची मदत केली जाईल.
- सचिन साबळे, कृषी सहाय्यक


KIW25B04804

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: पेविंग ब्लॉकच्या खड्ड्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेला; पुण्यातल्या 'या' मृत्यूला कोण जबाबदार?

Anil Ambani: अनिल अंबानींची ईडी करणार चौकशी; 17 हजार कोटींचा कर्ज घोटाळा, तपासात काय आढळले?

Tarot Horoscope August 2025: राज राजेश्वर योगामुळे मेष, मिथुनसह ४ राशींना लाभ; वाचा ऑगस्टचे टॅरो राशीभविष्य

Solapur News:'शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंतांचा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा'; निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी

August Long Weekend: ऑगस्टमध्ये लॉंग वीकेंड प्लॅनिंग करताय? मग 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा, आनंद दुपटीने वाढेल!

SCROLL FOR NEXT