पिंपरी-चिंचवड

शेतकऱ्याची स्वतःच्या कुटुंबासाठी सेंद्रित शेती

CD

संदीप भेगडे ः सकाळ वृत्तसेवा

किवळे, ता. ६ : वाढत्या नागरीकरणामुळे शहरालगतच्या ग्रामीण भागांतील शेती नष्ट होत चालली आहे. याशिवाय, वाढत्या खर्चाने ती परवडणारी राहिलेली नसल्याचे म्हटले जाते. मात्र, रावेतमधील शेतकरी राजेंद्र भोंडवे यांनी घराजवळच्या चार गुंठ्यांत सेंद्रिय शेती करणे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. त्यातील भाजीपाला ते बारा महिने स्वतःच्या कुटुंबासाठी वापरत आहेत.
रावेतमधील किवळे-ओंध बीआरटी मार्गालगत भोंडवे यांची शेतजमीन असून तिची दोन एकर क्षेत्रांत विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक एकर भागात त्यांचे जुने घर; तर दुसऱ्या एकरमध्ये नवीन बंगला उभा आहे. या बंगल्याच्या शेजारीच ते सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करत आहेत.
त्यामध्ये भेंडी, मेथी, शेपू, गवार, फ्लॉवर, कोबी, गाजर, बीट अशा अनेक प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. एक भाजी निघाली की दुसऱ्या पिकाची तयारी लगेच सुरू केली जाते. रासायनिक खते टाळून शेणखत वापरल्यामुळे भाजी ताजी आणि विषमुक्त राहत आहे.
फक्त भाजीपाला नव्हे, तर परिसरात आंबा, चिकू, सफरचंद, पेरू अशा असंख्य फळझाडांचीही लागवड करण्यात आली आहे. या झाडांवर बाराही महिने फळे लागत असतात.

शेतात दिवसाआड दोन किलोहून अधिक भाजीपाला तयार होतो. त्यामधून घरातील व शेतीसाठी मदत करणाऱ्या दुसऱ्या कुटुंबांसह १२ सदस्यांचे वर्षभराचे ताज्या भाज्यांचे पोषण होते.
- राजेंद्र भोंडवे, शेतकरी, रावेत

KIW25B04836

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chakan News : अखेर दिवाळीचा मुहूर्त मिळणार! तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या कामाच्या निविदा ऑक्टोंबर मध्ये खुल्या होणार

सणांचा आनंद दुप्पट होणार; एका पेक्षा एक चित्रपट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार, तुम्ही कोणता पाहणार

Mohol News : चिंचोली-काटी औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीला भीषण आग; आगीत कंपनी पूर्ण जळून खाक

Manchar News : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन; अवघ्या अर्ध्या तासात ८४ लाख रुपये झाले जमा

Georai Crime : धक्कादायक! चार महिन्याच्या चिमुकल्याची हत्या करून वडिलांनी गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT