पिंपरी-चिंचवड

नेरे-उर्से रिंगरोड, टीपी योजना रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पीएमआरडीए कार्यालय ः नेरे–उर्से रिंगरोड व नगररचना योजना रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी माजी राज्यमंत्री भेगडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली. नेरे-उर्से रिंगरोड, टीपी योजना रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

CD

किवळे, ता. १० : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नेरे, सांगवडे, दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे आणि धामणे या गावांतील प्रस्तावित नगररचना योजना तसेच ६५ मीटर रुंदीचा रिंगरोड (नेरे-उर्से) हे दोन्ही प्रकल्प अन्यायकारक असल्याचे सांगत ते तत्काळ रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पीएमआरडीएत नुकतेच ठिय्या आंदोलन केले.
माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीला ररचना संचालक अविनाश पाटील व सहसंचालक नगररचना श्वेता पाटील उपस्थित होते. भेगडे म्हणाले ‘या प्रकल्पांमुळे अंदाजे २१०० एकर बागायती शेतीचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला घालणारे हे प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही.’
या प्रकल्पांमुळे शेती, बागायती क्षेत्र आणि भविष्यातील शेतीव्यवसाय धोक्यात येणार असल्याने गावांचा विकास नव्हे तर ऱ्हास होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. शेतकऱ्यांशी संवाद साधून पीएमआरडीए प्रशासनाने प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रकल्प रद्द होत नाहीत तोपर्यंत विरोध सुरू ठेवण्याचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT