देहूरोड, ता. ६ : देहूरोड परिसरात बंगिया कृश्ती परिषद ट्रस्टतर्फे तर किवळेमध्ये गरवी गुजराती समाजातर्फे सार्वजनिक दुर्गोत्सव श्रद्धा, भक्तिभाव आणि सांस्कृतिक जल्लोषात पार पडला.
षष्ठीपासून दशमीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण उत्सवी झाले. महाषष्ठी पूजा, सप्तमी-अष्टमी-नवमी पूजन, संधी पूजा, हवन तसेच दशमीच्या दिवशी सिंदूर खेलास महिला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
दररोज भोग वितरण, सायंकाळची आरती, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मंडप परिसर गजबजलेला होता. विशेष आकर्षण ठरलेला आनंद मेळा (फूड मेळा) आणि सांस्कृतिक कार्यक्रमास भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
ट्रस्टचे अध्यक्ष अमित मुखर्जी, सचिव प्रीतिश बनिक, खजिनदार संजीत पॉल, दुर्गापूजा समितीचे अध्यक्ष दीपेन रॉय, सचिव अरिंदम डे, खजिनदार समीर कुमार यांनी संयोजन केले.
गरवी गुजरातींचाही उत्साह
किवळे येथील गरवी गुजराती समाजातर्फे नवरात्री उत्सव उत्साहात आणि पारंपरिक ढंगात साजरा करण्यात आला. या उत्सवात दररोज गरबा-दांडियाचे कार्यक्रम झाले. समाजातील महिला,युवक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गरवी गुजराती समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले. तसेच साळुंके वस्ती येथील गुडूबाई मित्र मंडळाच्यावतीने नवरात्री उत्सवात विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम पार पडले. अध्यक्ष सुधीर साळुंखे यांनी संयोजन केले.
KIW25B05034
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.