पिंपरी-चिंचवड

लोणावळा नगरपरिषदेची अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध

CD

लोणावळा, ता. १८ : लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना सोमवारी जाहीर झाली. एक प्रभाग वाढला असून एकूण १३ प्रभागांमधून २७ नगरसेवक निवडण्यात येतील. नगरसेवकांची संख्या दोनने वाढली आहे.
दोन सदस्यीय प्रभागरचना आहे. एकच प्रभाग तीन सदस्यांचा आहे. प्रभाग क्रमांक १३ (भुशी रामनगर) भौगोलिक तसेच लोकसंख्येच्या निकषावर सर्वांत मोठा आहे.
या रचनेवर २०२२ मधील रचनेचा प्रभाव आहे. काही प्रभागांच्या रचनेत बदल झाल्याने विद्यमान नगरसेवकांना नवा प्रभाग शोधवा लागेल. प्रारूप प्रभागरचना पाहता इच्छुकांमध्ये ‘कही खुशी कही गम’ असे चित्र आहे.
यंदा जनगणना झाली नसल्याने मागील दहा वर्षांत वाढलेली अंदाजित लोकसंख्या विचारात घेता नगरसेवकांची संख्या वाढली आहे. निवडणुका इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणासह होणार आहे. काही प्रभागांची रचना पाहता प्रस्थापितांना धक्का देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. प्रभागरचना कशीही असली तरी आतापर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही सामोरे जाऊ, अशी प्रतिक्रिया काही लोकप्रतिनिधींनी दिली आहे.
--
दृष्टिक्षेपात
५४ हजार ११९ ः लोकसंख्या
७५८० ः अनुसूचित जाती (एससी)
२१९२ ः अनुसूचित जमाती (एसटी)
----
प्रभागरचना
क्र. ः नाव ः लोकसंख्या (कंसात परिसर)
१ः न्यू तुंगार्ली ः ३६८६
(इंदिरानगर, गोल्ड व्हॅली, आंबेडकर नगर, गुरुकुल हायस्कूल, डॉन बॉस्को हायस्कूल)
२ः तुंगार्ली गावठाण ः ३८८४
(गावठाण, नारायणीधाम, बद्रीविशाल सोसायटी, सिल्व्हर व्हॅली, तुंगार्ली पोलिस ठाणे, टाटा कॅम्प)
३ः वलवण ः ४०२९
(गाव, समतानगर, वऱ्हाणपूर, पांगोळी, जिजामाता नगर)
४ः रेल्वे विभाग ः ३७२२ (अनुसूचित जाती ८९५)
(रेल्वे अतिथी गृह, स्थानक परिसर, बारा बंगला, कालेकर मळा, रेल्वे इन्स्टिट्यूट, एसटी स्थानक, व्हीपीएस हायस्कूल)
५ः नांगरगाव ः ४०१० (अनुसूचित जाती ६४०)
(गावठाण, औद्योगिक वसाहत, निशिगंधा सोसायटी, डेनकर कॉलनी, जिजामाता नगर)
६ः भांगरवाडी विभाग १ ः ४३२३
(मातृछाया बिल्डींग, अनुजा अपार्टमेंट ते पार्क व्ह्यू, लोहगड उद्यान चौक ते चव्हाण कॉर्नर, डफळ घरापर्यंत कुसगाव रस्ता)
७ः भांगरवाडी विभाग २ ः ३९२३
(भांगरवाडी नांगरगाव रेल्वे फाटक ते रेल्वे लाईन, राममंदिर ते दामोदर कॉलनी मार्ग, दक्षिणेस इंद्रायणी नदी ते कुसगाव रस्ता, धुपछाव बिल्डींग ते कुसगाव रस्ता)
८ः लोणावळा बाजार ः ४२७७ (अनुसूचित जाती ः ८०८)
(हुडको, इंद्रायणी नगर, बाजारपेठ, नगरपरिषद कार्यालय, महात्मा फुले भाजी मंडई)
९ः लोणावळा गावठाण ः ३६३६ (अनुसूचित जाती ः १३११)
(संत रोहीदास नगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, गावठाण, मस्जीद परिसर, मार्कर मंझिल ते महात्मा फुले भाजी मंडईपर्यंतची रेल्वे हद्द)
१०ः गवळीवाडा ः ४२१८
(गवळीवाडा, न्यू तुंगार्ली, नगरपरिषदेची मौजे कुणे नामापर्यंतची हद्द)
११ः खंडाळा ः ४१३६ (अनुसूचित जाती ः ५६३, अनुसूचित जमाती ः ५३०)
(नेताजीवाडी, बॅटरी हिल, केळपेठ, गावठाण, विकास व्हॅली, हिलटॉप कॉलनी, शिवाजी पेठ)
१२ः जुना खंडाळा ः ३९०२
(रायवूड, खोंडगेवाडी, भैरवनाथ मंदिर परिसर, जुना खंडाळा मार्ग परिसर, वर्धमान सोसायटी)
१३ः भुशी - रामनगर ः ६३७३ (अनुसूचित जाती ः ९६५, अनुसूचित जमाती ः ५६३)
(सर्व्हे क्र. ३०, हनुमान टेकडी, भुशी, रामनगर, ठोंबरेवाडी, रस्टीक
हायलँड, इंदिरानगर, जुना खंडाळा, लोणावळा डॅम)
-----
लोगो
40823
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : रोहित शर्माला वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नवा कॅप्टन; BCCI ने जाहीर केले संघ

Ramdas Kadam: चंद्रग्रहण रात्री दोन नग्न बाबा आणि बोकड, पत्नीवर आरोपांमुळे दुःख; कदमांचा भयंकर दावा

R Ashoka : 'डिसेंबरपर्यंत राज्यातील मुख्यमंत्री बदलणार'; विरोधी पक्षनेत्याच्या दाव्याने खळबळ, भाजप 'ऑपरेशन कमळ' राबविणार?

प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची पत्रिका समोर; शंभूराजसोबत 'या दिवशी अडकणार लग्नबंधनात, शेअर केला व्हिडिओ

IND vs WI 1st Test : भारतीय संघाचा ९२१ वा विजय... इंग्लंडशी बरोबरी अन् रवींद्र जडेजाने नोंदवले भारी पराक्रम, मोडला विराटचा विक्रम

SCROLL FOR NEXT