पिंपरी-चिंचवड

लोणावळ्यात अतिमुसळधार

CD

लोणावळा, ता.२० : लोणावळा, खंडाळा परिसरास अतिमुसळधार पाऊस नोंदवला गेला. बुधवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विक्रमी तब्बल ४३२ मिलीमीटर पावसाची हवामानशास्त्र विभागाने केली.
लोणावळा आणि परिसरात सतत सुरू असलेल्या पावसाने गेल्यावर्षीची सरासरी ओलांडली आहे. यावर्षी आतापर्यंत चार हजार ८१० मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी आजअखेर हे प्रमाण चार हजार ५१४ इतके होते.
दरम्यान, लोणावळा धरणातील पाणीसाठा पंच्याहत्तर टक्क्यांवर गेला असून, द्वारविरहित सांडव्यावरून विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन टाटा पॉवर कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

पर्यटकांसाठी भुशी धरणावर मनाई
अतिमुसळधार पावसामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरुन जवळपास अडीच ते तीन फुट पाणी वाहत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लोणावळा पोलिसांनी भुशी धरणाच्या सांडव्यावर जाण्यास पर्यटकांना मनाई केली आहे. लोणावळा ते आयएनएस शिवाजी मार्गावर नाला तुंबल्याने रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. परिसरातील ओढे-नाले, धबधब्यांना प्रचंड पाणी आले असून, इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

सोसायट्यांना पाण्याचा वेढा
कार्ला, मळवली, सदापूर भागातील अनेक सोसायट्यांना पाण्याने वेढा दिल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. याचबरोबर तुंगार्ली, ब्रदीविशाल सोसायटी, निसर्गनगरी येथे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचे प्रशासनाने सांगितले.

अनेक रस्ते पाण्याखाली
लोणावळ्यासह कार्ला, कुसगाव, औंढे-औंढोली ग्रामीण भागासही पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. कार्ला फाटा ते वेहेरगाव एकवीरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन ते तीन फुट पाणी साचले. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. लोणावळा ते पवनानगर रस्त्यावर कुसगाववाडी येथील पुलाजवळ, सदापूर रस्ता, मळवली-देवळे, औंढे रस्ता डोंगरगाव वाडी येथे रस्ता पाण्याखाली गेला. सदापूर येथील इंद्रायणी नदीवरील पुलास पाणी लागल्याने वाहनचालकांची त्रेधा उडाली.

दृष्टीक्षेपात
इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
ओढे-नाले ओसंडून; वाहतुकीसाठी रस्ते बंद
मागील वर्षीची सरासरी पावसाने ओलांडली
अनेक रहिवासी सोसायट्यांना पाण्याचा वेढा


छायाचित्र : LON25B04617

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT