लोणावळा, ता. १३ : भांगरवाडी येथील सार्वजनिक नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सुषमा कडू यांची निवड करण्यात आली आहे. त्या नेतृत्व महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सार्वजनिक नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाची यंदाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- सुषमा कडू (अध्यक्ष), सीमा शिंदे (उपाध्यक्ष), ज्योती मोरे (खजिनदार), चेतना अनसुलकर (सहखजिनदार), वर्षा भांगरे (चिटणीस), रेश्मा परब (सहचिटणीस)