लोणावळा, ता. १६ : राष्ट्रसेविका समिती निवेदिता लोणावळा शाखा, श्रिया रहाळकर व ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत सचिन रहाळकर यांच्या स्मरणार्थ ‘असे घडले शिवबा’ गोष्टी स्पर्धा पार पडल्या. विविध वयोगटात झालेल्या स्पर्धेत क्रिया एस, जान्हवी जगताप, विराज चौरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
लहान मुलांना शिवचरित्र गोष्टीरूपाने समजावे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार, पराक्रम, देशभक्ती या मूल्यांतून भावी पिढीस प्रेरणा मिळावी, सभाधीटपणा यावा, स्मरणशक्तीचा विकास होऊन बुद्धी तल्लख व्हावी हा या उपक्रमामागील मूळ उद्देश होता असे श्रिया रहाळकर म्हणाल्या.
ॲड. माधवराव भोंडे, राधिका भोंडे, ब्रिंदा गणात्रा लायन्स सुप्रिमोचे अध्यक्ष अमीन वाडीवाला यांचे उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
धीरूभाई कल्याणजी, राजेश मेहता, अनिल गायकवाड, बापूलाल तारे, सुनील कोपरकर आदी यावेळी उपस्थित होते.
विविध शाळांतून स्पर्धेसाठी ९० विद्यार्थी सहभागी झाले. आनंद गावडे, महेश थत्ते, विश्वनाथ पुट्टोल यांनी परीक्षण केले. शिल्पा कोपरकर यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -(प्रथम तीन क्रमांक अनुक्रमे)
वयोगट १ ली ते ४ थी : जान्हवी जगताप, अवधूत धाकोळ, मृणाल गोंधळी.
वयोगट ५ ली ते ७ वी : विराज चौरे,आराध्या हांडे, सर्वेश शिंदे.
वयोगट ८ ली ते १० वी : क्रिया एस, रुद्र शिंदे, संवाद्या साबळे.
उत्तेजनार्थ : तरुण मराठे, काव्या दाभाडे, श्रीहरी चातंतरा,प्रांजल घोडके, श्रद्धा उपाध्याय, जिया राजपुरोहित