पिंपरी-चिंचवड

कार्ला, कुसगावमध्ये सकाळपासून रांगा

CD

लोणावळा, ता. ७ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कार्ला आणि कुसगाव बुद्रूक परिसरात रविवारी मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. विशेषतः सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच युवकांचा सहभाग लक्षणीय होता. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत जवळपास पंचवीस टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहून कामकाज सुरू केले. मतदारांसाठी रांगेची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. दुपारनंतरही मतदानाचा उत्साह कायम राहिल्याचे चित्र होते. मतदारांनी संयम राखत मतदान केले. या निवडणुकीत एकूण मतदानाची टक्केवारी उत्साहवर्धक राहिल्याची प्राथमिक माहिती आहे. कुसगाव बुद्रूक तसेच कार्ला येथे किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. आता उमेदवारांसह समर्थकांचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.


गुलाबी थीम लक्षवेधी

लोकशाहीच्या उत्सवात महिलांचा सहभाग अधिक वाढावा, महिलांना सुरक्षित, स्नेहपूर्ण आणि सशक्त वातावरणात मतदान करता यावे, या उद्देशाने वाकसई, मावळ येथे सखी मतदान केंद्र उभारण्यात आले. या केंद्रावर संपूर्ण व्यवस्थापन महिलांच्या हाती देण्यात आले असून गुलाबी रंगसंगतीमुळे मतदान केंद्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासून आतील मतदान कक्ष, टेबल, सजावट, फुगे, फलक आदी सर्व ठिकाणी गुलाबी थीम ठेवण्यात आली होती. मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलिंग एजंट्स हे सर्व महिला असून त्यांनी पारंपरिक वेशभूषेत, शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासाने मतदान प्रक्रिया पार पाडली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik RTO : १८ वर्षांखालील मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना होणार जेल; नव्या वाहतूक कायद्याची विद्यार्थ्यांना माहिती

Propose Day 2026 Surprise: प्रपोज डे ला गोड सरप्राईज! हेल्दी ‘रागी ओट्स कपकेक’ नक्की ट्राय करा, पार्टनर करेल प्रेमाचा वर्षाव

Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी रेल्वेची 'बुलेट' गती! ३ कोटी भाविकांच्या गर्दीसाठी नाशिक रोडसह ५ स्थानकांचा कायापालट

Private Video Leak: पॉर्न सर्च करताना स्वतःचाच व्हिडिओ दिसला! हॉटेलमधील Hidden Camera मुळे व्हायरल झाले खासगी क्षण, कपल हादरलं

Bhaucha Dhakka Week 4 : "तुला बरबाद करेन" धमकी देणाऱ्या रुचिताला दीपालीचं रितेशसमोर चॅलेंज

SCROLL FOR NEXT