पिंपरी-चिंचवड

ऐसी लागी लगन, मीरा हो गयी मगन...

CD

मोशी, ता. ३ : ‘ऐसी लागी लगन, मीरा हो गयी मगन...वो तो गली गली गली, हरी गुन गाने लगी’, ‘जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम’, असे सुमधूर बोल सभागृहात उमटताच दर्दी श्रोते असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट केला.
निमित्त होते प्रसिद्ध गझल गायक अनुप जलोटा यांच्या ‘गझल बहार’ गायन कार्यक्रमाचे. आकुर्डीतील संतबाबा मोनी साहेब वृद्ध आनंद आश्रमाला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त संस्थापक अशोक खोसला यांनी पिंपरी चिंचवडकरांसाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात वरील कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमात जलोटा यांनी ‘चिठ्ठी आयी है वतन से चिठ्ठी आयी है’, ‘रंग दे चुनरिया’, ‘प्रभुजी तुम चंदन हम पानी’, ‘राम चदरिया झीनी रे झीनी’, ‘राधा के बिना श्याम आधा’, ‘तुम इतना क्यू मुस्कुरा रहे हो’, ‘दमा दम मस्त कलंदर’, ‘आज जाने की जीद ना करो’, आदी त्यांच्या प्रसिद्ध अशा भजन, गीते आणि गझलांच्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र वाधवा, रामचंद्र जमतानी, मनजीत सिंग ज्वाला, जय जमतानी, महिंदर सिंग, बलदेव सिंग, हर्षल कौर भाटी, योगेश दुगल, आनंद आगरवाल, परमानंद जमतानी आदींनी परिश्रम घेतले.

संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत शहरामध्ये पंकज उदास, जगजीत सिंग, जसबिंदर नुरा, सुरेश वाडकर, हरिहरन यांच्या गायनाचे कार्यक्रम घेतले आहेत. हे सर्व कार्यक्रम आश्रमातील ज्येष्ठांच्या आनंदासाठी घेत असल्याने या सर्व गायकांनी कधीच मानधन घेतले नाही. अनुप जलोटा यांनी देखील कोणत्याही प्रकारचे मानधन घेतले नाही.
- अशोक खोसला, अध्यक्ष, संत मोनी बाबा वृद्ध आनंद आश्रम, आकुर्डी

पिंपरी चिंचवड सांस्कृतिक नगरीमध्ये गझल गायन करताना अद्वितीय असा आनंद झाला. एवढ्या प्रचंड संख्येने जमलेले श्रोते दर्दी आहेत. हा ‘गझल बहार’ संस्मरणीय राहील. मी धन्य झालो. पिंपरी चिंचवडकरांना धन्यवाद.
- अनुप जलोटा, प्रसिद्ध गायक
MOS25B03730

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलचे पहिले कसोटी शतक! रवींद्र जडेजासह मिळून वेस्ट इंडिजचा 'गेम' केला, रिषभची वाढवली धडधड

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवा अन् ४० लाखांचा फंड मिळवा, 'ही' स्कीम माहिती आहे का?

लगाच्या १२ वर्षानंतर घेतला घटस्फोट; आता मुलाचा एकट्याने सांभाळ करतेय मराठी अभिनेत्री; , म्हणते- त्याला माझी गरज...

Crime: वृद्ध महिलेचं ३५ वर्षीय मजुरासोबत प्रेमाचं सूत जुळलं; एकत्र राहण्यासाठी भयंकर कृत्य केलं, जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं

"मुंज्या सिनेमा मराठीत बनणार होता पण.." दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा ; म्हणाला...

SCROLL FOR NEXT