पिंपरी-चिंचवड

लघुनाटिका, प्रभातफेरी, कवायती, देशभक्तीपर गीते

CD

पिंपरी, ता. १६ ः लष्करी सेवेतील आजी - माजी जवान, अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या हस्ते ध्वजवंदन, देशभक्तीपर गीते, नृत्य, लघुनाटिका, प्रभात फेरी, कवायती, बँडच्या तालावर योगा नृत्य, व्याख्याने आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आदी कार्यक्रमांनी शुक्रवारी (ता.१५) स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

चॅलेंजर पब्लिक स्कूल
पिंपळे सौदागर ः येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते, नृत्य आणि लघुनाटिकांनी सर्वांचे मन भारावून टाकले. प्रमुख पाहुणे सुजित डोंगरजाल यांच्यासह अमित काटे, योगेश भंडारकर, सतीश फुलारी, कृष्णराज कलघटगी, देवदत्त उधोवजी आणि स्मिता दळवी आदी उपस्थित होते. शाळेचे संचालक संदीप काटे यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसोबतच चारित्र्य घडवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या उपसंचालिका अनिता काटे यांनी भाषणातून एकतेचे महत्त्व पटवून दिले. प्राचार्या सुविधा महाले यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणाचा संदेश दिला.

श्री भैरवनाथ विद्यालय
मोशी : भोसरीतील श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे स्वातंत्र्य दिनी श्रीरंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ (आणे) या संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश बोरा यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
यावेळी माजी नगरसेवक रवी लांडगे, पांडुरंग गवळी, स्वप्निल लांडगे, प्राचार्य नवीनकुमार आहेर, उपप्राचार्य संजीवकुमार राणे, उपमुख्याध्यापक दीपक बागुल, पर्यवेक्षक प्रमोद थोरात, पर्यवेक्षिका सुनंदा जाधव आदी उपस्थित होते.

नक्षत्रम एल सोसायटी
चिंचवड : प्रेमलोक पार्क येथील नक्षत्रम एल हौसिंग सोसायटीमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. समीर कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. लहान मुलांनी देशभक्तिपर गीते सादर केली. सोसायटीच्या अध्यक्षा रुचिता बंडी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. जगदीश मुंदडा यांनी स्वागत केले. समृद्धी पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले; तर अभय कुलकर्णी यांनी आभार मानले.

मातृसेवा वृद्धाश्रम
चिंचवड : मातृसेवा वृद्धाश्रम सेवाभावी संस्थेमध्ये स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहण्यात आली. वृद्धाश्रमातील आजींच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. आजी-आजोबांनी देशभक्तीपर गाणी गाऊन उपस्थितांमध्ये स्फूर्ती व चैतन्य निर्माण केले. जयराम करंदीकर यांनी ‘बलसागर भारत हो’ हे गीत सादर केले; तर ९० वर्षीय आजींनी राष्ट्रगीत म्हटले. कार्यक्रमाला बालवाडी, अंगणवाडीतील लहान मुलांनीही हजेरी लावली.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुहास गोडसे, संचालक दिशा गोडसे, मानसी गोडसे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत बरसावडे, राजेंद्र पवार, ममता पवार, रजाबाई बालूरे, योगिता फलके यांच्यासह वृद्धाश्रमातील सर्व रहिवासी व नागरिक उपस्थित होते.

कामगार कल्याण केंद्र
चिंचवड : उद्योगनगर येथील राज्य कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्रात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एसकेएफ इंडिया लि.चे सरव्यवस्थापक योगेश खंदारे, ज्येष्ठ विचारवंत मधु जोशी, इसीए संस्थेचे सिकंदर घोडके, गुणवंत कामगार स्वानंद राजपाठक, समाज प्रबोधनकार शारदा मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवर मोहन गायकवाड, सुभाष चव्हाण, सोमनाथ पतंगे, सुधाकर खुडे, प्रवीण वाघमारे, अण्णा गुरव, भरत शिंदे आदी उपस्थित होते. केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले; तर स्वानंद राजपाठक यांनी आभार मानले. अश्विनी दहीतुले आणि सहकाऱ्यांनी संयोजन केले.

श्री चिंतामणी मित्र मंडळ
चिंचवड : वाल्हेकरवाडी येथील श्री चिंतामणी मित्र मंडळातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त लष्करी सेवेतील आजी - माजी जवान, अधिकाऱ्यांच्या पत्नींचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
या प्रसंगी अनिता चोळके, राजश्री आटपाडकर, पल्लवी पवार, प्रमिला स्वामी, कल्पना अबनावे, लता माळी, चंद्रभागा चव्हाण आणि सुनीता नगरकर या भगिनींच्या हस्ते झेंडावंदन झाले. मंडळाचे अध्यक्ष नीलेश आहेर यांनी स्वागत केले. सचिव दिलीप पडवळ यांनी प्रास्ताविक केले; तर राजीव शेंडे यांनी सूत्रसंचालन केले.
CWD25A01813


बाबुराव घोलप महाविद्यालय
पिंपळे गुरव ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे नवी सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव (प्रशासन) ए.एम.जाधव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी सर्वांना ध्वज प्रतिज्ञा दिली.


ग्लोबल सोसायटी
मोशी : ग्लोबल सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत मातेच्या प्रतिमेस रत्नप्रभा सोनार व महात्मा गांधीच्या प्रतिमेस नवीन भोसले यांनी पुष्पहार अर्पण केले. ज्येष्ठ नागरिक नवनीत सोनार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
तरंग कुमार, शारदा नेवसे यांनी व सरस्वती भजनी मंडळ यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. सोसायटीमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रसंगी नीलेश बोराटे, राजेंद्र हिंगमिरे, सुहास कॅसेटवार, संदीप तडवळे, प्रल्हाद मस्के, भारत भारद्वाज, सुरेश गावंडे, गणेश कानडी आदींसह उपस्थित होते. दया पटेल यांनी आभार मानले.

एम.एम.विद्यालय
काळेवाडी : मराठवाडा मित्र मंडळाच्या एम. एम. विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून देशभक्तीपर घोषणा दिल्या. राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक संजय जोशी, तेज निवळीकर, प्रा. संतोष शेणई, अंकुश काळखैर, संदीप सावळे आदी उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांसह यावेळी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पथसंचलन केले. तसेच कवायती सादर केल्या. मुख्याध्यापिका पी. एम. जट्टे यांनी प्रास्ताविक केले; तर सुप्रिया खोपडे यांनी सूत्रसंचालन केले. विजयश्री काजळे यांनी आभार मानले.

भाऊसाहेब तापकीर विद्यालय
काळेवाडी ः कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वीर जवान परिवारांसाठी कार्यरत असणाऱ्या शुभांगी सरोटे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पुणे पीपल को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक अंगद शेवाळे, राष्ट्रीय सैनिक संस्थेचे कार्यकर्ते राजवीर शर्मा, पूनम शर्मा, डॉ. राजीव कुंभार, संस्थेचे अध्यक्ष विवेक तापकीर, सचिव मल्हारी तापकीर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, मुख्याध्यापिका जयश्री पवार आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन सादर करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. प्रियांका जाधव यांनी सूत्रसंचालन केले; तर स्वाती देसाई यांनी आभार मानले.


शाळा, सोसायट्यांमध्ये उत्साह
रावेत ः महानगरपालिका शाळा क्र. ९६, किवळे क्र. ९७ येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कवायत व संचलनाचे प्रभावी सादरीकरण केले.
क्र.९६ च्या शाळेतील कार्यक्रमाचे मुख्याध्यापिका सरस्वती भेगडे, रेखा गादेकर, वृषाली मुंडे, शिल्पा अबनावे, मृणाल शिंदे, विजयालक्ष्मी कामठे, अर्चना साळुंके, संपदा काळे आणि नेताजी घोलप आदींनी नियोजन केले.
महापालिका प्राथमिक शाळा रावेत क्र. ९७ येथे विद्यार्थ्यांनी बॅंड पथकासह घोषणा देत प्रभात फेरी काढली. विद्यार्थ्यांनी कवायत प्रकार, साहित्य कवायत, योगा नृत्य बॅंडच्या तालावर सादर केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. माजी पोलिस पाटील दिवाणी भोंडवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर ९७ क्रमांकाच्या शाळेतील कार्यक्रमांचे नियोजन सायरा शिकलगर, जयश्री जाधव, अर्चना ओहोळ, चारूशिला जाधव, पांडुरंग घुगे, सूरज गायकवाड आदींनी केले.

सोसायट्यांमध्येही आयोजन
आकुर्डी गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे स्वातंत्र्य दिनाचा भव्य सोहळा देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. ॲड. शुभम देशमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. विश्वरत्न बुद्ध विहार, सिद्धार्थ मेमोरियल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले. सेलिस्टियल सिटी सोसायटी, नॅनो होमस्, रुणाल गेटवे सोसायटी, मी रावेत सोसायटी, ऐश्वर्य सोसासटी, आकुर्डी येथेही ध्वजवंदन करण्यात आले.


जुनी सांगवीत, दापोडीत कार्यक्रम
जुनी सांगवी ः जुनी सांगवी, दापोडी परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दापोडी येथे अत्तार वीटभट्टी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दापोडी विभागाच्या संकल्पनेतून ५० फूट उंचीचा तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी सुशील सोनकांबळे, सुधीर जम, रेखा जम आदी उपस्थित होते.
जुनी सांगवी येथील शाळा, स्वयंसेवी संस्था, मंडळे, प्रतिष्ठानच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जुनी सांगवी येथील मराठी प्राथमिक शाळा, नृसिंह हायस्कूल, अरविंद एज्युकेशन सोसायटी, नूतन माध्यमिक विद्यालय, महापालिकेची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळा येथे ध्वजवंदन करण्यात आले. मधुबन मित्र मंडळ, सिझन सोशल ग्रुप प्रशांत शितोळे मित्र परिवार, अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ, फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन, सावित्रीबाई फुले महिला सामाजिक संस्था आदींच्यावतीने ध्वजवंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

Thane Traffic: ठाणेकरांच्या उत्साहाला कोंडीचे ग्रहण, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT