पिंपरी-चिंचवड

परिचारिका कायदा नियमांत बदल करण्याची मागणी

CD

मोशी, ता ११ : आयुर्वेद क्लिनिक, पंचकर्म सेंटर व आयुर्वेद हॉस्पिटल यांच्यासाठी परिचारिका कायदा (बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्ट) आणि (बायो-मेडिकल वेस्ट) जैविक कचरा नियमावलीत बदल करावेत, अशी मागणी आयुर्वेद वैद्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.
मुंबई येथे मंत्रालयात राज्यातील आयुर्वेद वैद्यांनी आबिटकर यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या भेटीत आयुर्वेद वैद्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीसाठी मर्म संस्थेचे अध्यक्ष अजित राजिगरे यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच निमा आयुर्वेद फोरम सेंट्रल कौन्सिलचे अध्यक्ष नीलेश लोंढे, खजिनदार महेश पाटील, सभासद सागर अर्डक, ग्लोबल आयुर्वेद प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, खजिनदार श्याम जगताप, निमा महाराष्ट्र आयुर्वेद फोरमचे अध्यक्ष अमोल ठवळी, निमा पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रताप सोमवंशी, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन आणि आयुर्वेद व्यासपीठ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
आयुर्वेद हॉस्पिटल, क्लिनिक व पंचकर्म सेंटरमध्ये नर्सिंग स्टाफऐवजी प्रशिक्षित पंचकर्म थेरपिस्ट व पेशंट असिस्टंट स्टाफ आवश्यक आहे, त्यानुसार नियमांत तरतूद व्हावी. आयुर्वेदिक उपचारांमधून अल्प प्रमाणात जैविक कचरा निर्माण होत असल्याने वेगळी व्यवस्था करावी. शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी स्वतंत्र तरतुदी व्हाव्यात आदी वैद्यांच्या मागण्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Sonika Yadav Video: सात महिन्यांची गर्भवती जिद्दीने उभी राहिली! वेटलिफ्टिंग स्पर्धेत १४५ किलो भार उचलून जिंकले पदक

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SIR प्रक्रियेच्या १२ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव का नाही? निवडणूक आयोगाने थेट उत्तरच दिले!

Harman Investment Pune : पुण्यात होणार तब्बल ३४५ कोटींची गुंतवणूक; ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिळणार नोकऱ्या

SCROLL FOR NEXT