पिंपरी-चिंचवड

भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून पर्यावरणाचा जागर

CD

मोशी, ता. १६ : भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे, महापालिकेचा वृक्षसंवर्धन विभाग आणि विविध पर्यावरण प्रेमी स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा, माझी जबाबदारी’ अंतर्गत आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह व भोसरी मध्यवर्ती केंद्र उद्यान परिसरात विविध प्रकारच्या देशी झाडे लावण्यात आली.
प्राधिकरणातील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या गृहपाल शीतल वाकारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित पाटील, उद्योजक नवनाथ कोलते आदींच्या हस्ते वृक्षांचे पूजन करण्यात आले. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जामदार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित पाटील, भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी, शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुली, जंगल गार्डन ग्रुप, संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ, लायन्स क्लब पिंपरी-चिंचवड स्टार्स आदी संस्थांनी सहभाग घेतला.
पर्यावरण समतोलासाठी वृक्ष लागवड काळाची गरज आहे. या मोहिमेत सहभागी होऊन पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी याविषयी उचललेले पाऊल दिशादर्शक आहे. जनतेकरिता कर्तव्य बजावत असताना देखील सामाजिक बांधिलकी जपत घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे असे कौतुकोद्‍गार यावेळी काढण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक एस. इंगळे, राजेंद्र ढेंगळे, मनोज माकोडे, एकनाथ फटांगडे, अजिंक्य पोटे, रमेश पामलवाड, अनिल जगताप, ज्योती दरंदले, शैला इचके, मीना आखाडे, व लायन्स क्लब पिंपरी-चिंचवड स्टार्सच्या प्रिती बोंडे, विद्या वकारे, जितेश वकारे, जयंत बोंडे आदींनी वृक्षारोपणात सक्रीय सहभाग घेतला.

या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी अमित पाटील, भूगोल फाउंडेशनचे सर्वच सदस्य, जंगल गार्डनचे विश्वनाथ टेमगिरे, संतोष दौंडकर, गिरीश वाघमारे, निवृत्ती अमुप, स्वदीप अडसुळ यांनी विशेष परिश्रम घेतले. वृक्ष व संवर्धन विभाग महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक वाळुंज, प्रदीप देसाई यांचे सहकार्य लाभले.
MOS25B03873, MOS25B03874

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT