पिंपरी-चिंचवड

मोशी प्राधिकरणात अनधिकृत पार्किंगची समस्या

CD

मोशी, ता. २८ : मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक चार, सहा व नऊ या परिसरात स्पाइन रस्ता, सेवा रस्ता तसेच अंतर्गत पेठांमध्ये अनधिकृत वाहन पार्किंग होत असल्याने स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला स्पष्टपणे नामफलक लावलेले सेवा रस्ते असतानाही अवजड वाहने रात्री तसेच दिवसा उभी केले जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
सेवा रस्त्यावर कंटेनर आणि मोठी वाहने उभी असतात. अचानक समोर वाहन आल्याने ब्रेक मारावा लागतो. अनेक वेळा अपघात टळले आहेत, पण रोज भीती वाटत असल्याचे एका दुचाकीस्वाराने सांगितले.
काही वाहनचालक या ठिकाणी स्वयंपाक करत असल्याने अस्वच्छता निर्माण होत आहे. धूर, कचरा व गैरसोयीमुळे परिसरातील महिलांना संध्याकाळच्या वेळेत ये-जा करणे अवघड होत आहे. एका स्थानिक महिलेने सांगितले, सायंकाळी किंवा रात्री या रस्त्याने जाताना भीती वाटते. वाहनाभोवती लोकांची गर्दी, स्वयंपाक व अस्वच्छता यामुळे असुरक्षित वाटते.
या समस्यांकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update :धावत्या ट्रेनमधून वैतरणा नदीत पडला तरुण, सतर्कतेमुळे जीव वाचला

हॉटेलमध्ये चालवलं जायचं सेक्स रॅकेट, ५०० तरुणी, १०० ग्राहक; दलाल २० हजार घेऊन तरुणींना द्यायचे ५ हजार

SCROLL FOR NEXT