मोशी, ता. ७ : पिंपरी-चिंचवड शहरासह मोशी उपनगरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील मुख्य चौक ते टोलनाक्यादरम्यान असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आपटल्याने दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत असून, अनेकांना पाठदुखी, मानेचे आजार व शारीरिक त्रास जाणवत आहेत.
या खड्ड्यांमुळे वाहनांचे सस्पेन्शन, टायर व इतर भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने ते लक्षात येत नाहीत आणि अपघातांचा धोका अधिक वाढतो. पादचाऱ्यांनाही चालताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे.
शहरातून जाणारा हा मुख्य महामार्ग खड्ड्यांनी भरल्याने मोशी शहराच्या प्रतिमेला गालबोट लागले आहे. वाहतूक कोंडी, अपघात आदींमुळे आमच्यासारख्या नोकरीनिमित्ताने दैनंदिन प्रवास करताना अडचणीचे झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी.
- मंगेश आवटे, वाहनचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.