पिंपरी-चिंचवड

वाघेश्वर महाराज मंदिरातील शिवमहापुराण कथेला गर्दी

CD

मोशी, ता. ११ : चऱ्होली येथील ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज मंदिराच्या ७ व्या कलशारोहण वर्धापनदिनानिमित्त चऱ्होली ग्रामस्थ आणि श्री वाघेश्वर स्वकाम सेवा मंडळाच्यावतीने १४ फेब्रुवारीपर्यंत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत शिवमहापुराण कथा सोहळा, शिवलीलामृत पारायण, महारुद्राभिषेक, महिला भजने, महाआरती आणि दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवपुराण कथाकार मोहन महाराज गिरी यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्यामध्ये महादेवाने साकारलेले तांडव नृत्य भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीने मंडप खचाखच भरत आहे. सर्व भाविकांनी शिवमहापुराण कथाश्रवण, तांडव नृत्याचा आध्यात्मिक आनंद घेतला. शिवकथेच्या दरम्यान मंदिर परिसरात ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’ आणि छत्रपती श्री शिवराय यांच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले.
शिवमहापुराणात भगवान शंकराचे चरित्र, त्यांचे वैराग्य, भक्तांवरील कृपा, सृष्टीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य आणि चऱ्होली येथील ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज मंदिराचे महात्म्य यांचे गिरी महाराज यांनी सविस्तर वर्णन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चऱ्होली ग्रामस्थ, श्री वाघेश्वर स्वकाम सेवा मंडळ व मंदिर विश्वस्त मंडळ, स्वयंसेवक, भक्तांनी विशेष परिश्रम घेतले. शनिवारी (ता.१४) काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
MOS26B04197

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

Ankita Bhandari Murder: खरे पीडित अंकिताचे आई वडीलच, बाकी फक्त राजकारण करतायत! मुख्यमंत्री भावूक; म्हणाले, गुन्हेगारांना सोडणार नाही

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

SCROLL FOR NEXT