पिंपरी-चिंचवड

हवेतील धूलिकणांच्या प्रमाणात मोठी वाढ

CD

रावेत, ता. १२ : पावसामुळे नैसर्गिकरित्या वातावरणातील धूलिकणांवर होणारी फवारणी बंद झाल्यामुळे
रावेत, आकुर्डी, प्राधिकरण, निगडी, किवळे आणि परिसरात हवेतील धूलिकणांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
परिणामी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकाराने ग्रस्त रुग्णांची तब्येत बिघडत आहे.
मागील आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रावेत, आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, किवळे परिसरात हवामानात लक्षणीय बदल झाला आहे. वाढती रहदारी, खराब रस्ते तसेच अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे वातावरणामध्ये धूलिकणांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. पावसाचा अभाव आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.


काय आहेत तक्रारी...
- दमा, ॲलर्जी, सायनसग्रस्त रुग्णांना श्वास घेणे कठीण
- डोळे चुरचुरणे, घसा कोरडा पडणे, सततचा खोकला आणि थकवा
- लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आजारपणाची लक्षणे

उपाय योजना काय ?
- धूळ नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी करणे
- खराब रस्त्यांचे लवकर डांबरीकरण करणे
- उघड्या मातीवर हरित पट्टे तयार करणे
- वाहतुकीच्या नियमनाद्वारे धूलिकणांवर नियंत्रण


धूलिकण हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. त्यामुळे श्वसनविकार, ॲलर्जी आणि त्वचाविकाराचे प्रमाण वाढत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेषतः काळजी घेणे आवश्यक आहे. श्वसनासंबंधित काही अडचणी असल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- बाळासाहेब हेडघर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, कुटे रुग्णालय, आकुर्डी

धूळ आणि धुराचे कण, वातावरणातील दूषित घटकांमुळे हवा खूप प्रदूषित झाली आहे. परिणामी, दामा, फुफ्फुससंबंधित आजाराचे रुग्ण वाढवले आहेत. बांधकाम प्रकल्प व रस्त्यावरील धूळ यांचेही प्रमाण जास्त आहे. सध्या हवेतील सूक्ष्मकणामुळे पीएम इंडेक्सचे प्रमाण ३० टक्के वाढले आहे. लहान मुलांच्या अस्थमाचे प्रमाण वाढत आहे.
- डॉ. रवींद्र साळवे, क्षयरोग तज्ज्ञ, आकुर्डी


रस्त्यांवर दररोज ट्रक आणि डंपरची वर्दळ असते. रस्ता खड्ड्यांनी भरलेला असून धूळ उडते. मुलांना सतत खोकला आणि सर्दी होत आहे. डॉक्टरकडे वारंवार जावे लागत आहे. धूलिकण कमी करण्यासाठी महापालिकेने पाण्याची फवारणी करावी.
- राजेश साळुंखे, नागरिक


NGI25B00737

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT