सकाळ इम्पॅक्ट
निगडी, ता.९ ः निगडी बस स्थानक परिसरातील खचलेल्या रस्त्यावर महापालिका कर्मचाऱ्यांनी सोमवारी वाळू व इतर साहित्य टाकून तात्पुरती दुरुस्त केली. त्यामुळे प्रवासी, दुचाकीस्वार आणि वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून निगडी बस स्थानक परिसरातील खचलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. निगडी बस स्थानक परिसर हा नेहमीच प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेला असतो. खचलेल्या रस्त्यामुळे बस पकडणाऱ्या प्रवाशांना धोका निर्माण झाला होता. अनेक वेळा दुचाकी घसरल्याने किरकोळ अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.
महापालिकेने खड्ड्यांमध्ये वाळू आणि खडी टाकून तो भरून काढला आहे. मात्र, पावसाळ्यात ही तात्पुरती दुरुस्ती किती काळ टिकेल ? याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम आहे. स्थानिक रहिवासी संदीप जाधव म्हणाले, ‘‘रस्त्यावरील खड्डा भरला ही आनंदाची बाब आहे. पण, कायमस्वरूपी डांबरीकरणाची कामे झाली नाहीत; तर काही दिवसांत पुन्हा हीच समस्या निर्माण होईल.’’
NGI25B00825
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.