पिंपरी-चिंचवड

सार्वजनिक स्वच्छतागृहे नव्हे; दुर्गंधीची केंद्रे

CD

पिंपरी, ता.३० : रावेत, आकुर्डी, प्राधिकरण आणि निगडी परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे दुर्गंधीची केंद्रे बनली आहे. अस्वच्छता, कचऱ्याचे ढिगारे आणि जीर्णावस्थेतील स्वच्छतागृहांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
निगडीमधील कै.मधुकरराव पवळे पुलाखालील वाहनतळ हा दुर्गंधीचा आगार झाल्याचे चित्र आहे. फेरीवाले आणि भिक्षेकऱ्यांनी इथे कब्जा केला असून खुलेआम नैसर्गिक विधी आणि घाण करत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि डासांचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. शिवाय अस्वच्छता अधिकच पसरली आहे.
रावेत आणि परिसरात रस्त्यावर एका बाजूने कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. रस्त्याने जाताना नागरिक नाकावर रुमाल धरून चालतात. हॉटेलमधील उरलेले अन्न इथे टाकले जात असल्यामुळे भटके श्वान आणि मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात जमा होतात. परिणामी अपघात होण्याची शक्यताही वाढत आहे.
रावेत, मुकाई चौक, आकुर्डी आणि प्राधिकरण परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था वाईट आहे. नियमित साफसफाई होत नसल्याने त्याचा थेट परिणाम महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर होत आहे. काही स्वच्छतागृहांमध्येही घाण पसरली आहे.

काय करता येईल ?
- स्वच्छता हे केवळ घोषवाक्य नव्हे; तर प्रत्येकाची जबाबदारी
- नागरिकांनी जबाबदारीने कचरा योग्य ठिकाणी टाकणे
- सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता
- डास निर्मूलनासाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक
- महापालिका व नागरिकांनी संयुक्तरीत्या उपाय शोधणे

‘‘मी रोज ऑफिसला जाण्यासाठी पवळे पुलाखाली माझी दुचाकी लावते. इथे मोठ्या प्रमाणात भिक्षेकरी लोकांचा अड्डा झाला असून सगळीकडे अस्वच्छता आहे. रिक्षाचालकांची मोठी गर्दी असते. पार्किंगमध्ये उघड्यावर नैसर्गिक विधी केले जात असल्यामुळे सायंकाळी दुचाकी काढताना जीव गुदमरतो.
- अश्विनी धायगुडे, प्रवासी, निगडी

सार्वजनिक स्वच्छतागृहाची स्वच्छता रोजच केली जाते. काही ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद असतो. मात्र, अनेक ठिकाणी नागरिक घाण करतात. स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या सापडतात. नागरिकांनी स्वच्छता राखण्यास प्रतिसाद द्यावा.
- रुपाली साळवे, आरोग्य निरीक्षक, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय

NGI25B00897

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Work in Germany: जर्मनीत काम करण्याची सुवर्णसंधी; 7 लाखांहून अधिक पदं रिक्त, कोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी?

Omkar Elephant : ‘ओंकार’ हत्तीचा धुमाकूळ, आणखी ५ हत्तींच्या कळपाने वनविभागाला दिलं आव्हान

Crime News : जामिनावर सुटलेल्या खुनाच्या संशयिताची मिरवणूक काढणे तरुणांना भोवले; नाशिक रोड पोलिसांनी काढली धिंड

"आम्ही ठरवून एकमेकींना फॉलो करत नाही" दीपिकासोबत भांडणाच्या चर्चांवर फराहचं स्पष्टीकरण ; म्हणाली..

Nashik News : उत्सव नवरात्रीचा तयारी महापालिकेची!; साडेतीन वर्षांची कसर भरण्यासाठी इच्छुकांकडून ‘इव्हेंट्स’ची धूम!

SCROLL FOR NEXT