पिंपरी, ता.१ : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्षयरोग (टीबी) दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगमुक्त भारत हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिकेमार्फत ही मोहीम डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मोहिमेत रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांनाही आवश्यकतेनुसार प्रतिबंधक उपचार दिले जात असल्याने सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. क्षयरोगाविषयी जनजागृती, तपासणी आणि उपचारांची गती वाढली आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने १०० दिवसांची मोहीम पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील नियोजन केले. वर्ष २०२४ मध्ये एकूण ३२०० क्षयरुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी २०२५ च्या जूनअखेर १९३२ रुग्णांवर सातत्याने उपचार सुरू आहेत. सध्या डिसेंबर २०२५ पर्यंत ही मोहीम वाढविण्यात आली आहे. सध्याला १८२४ रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के इतके झाले आहे. रुग्णांना सहा महिन्यांसाठी ६ हजार रुपयांची मदत केली जात आहे.
मोहिमेवर दृष्टिक्षेप
- निकषय मित्र पोर्टलद्वारे रुग्णांची नोंदणी
- निकषय मित्र योजनेअंतर्गत रुग्णांना मदत
- आठ मुख्य रुग्णालयांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार
- वायसीएम रुग्णालयामध्ये अधिक प्रमाणात रुग्ण नोंदणी झाली
- भोसरी, यमुनानगर, आकुर्डी, जिजामाता, पिंपरी, सांगवी, थेरगाव रुग्णालयात अभियान
आरोग्य सेवा, उपाययोजना
- बोर्ड मास इव्हेंट्स, क्षयरोग तपासणी शिबिरे, घरभेटी,
- तंबाखू, मद्य सेवनाबाबत जनजागृती
- एक्स-रे, सीबीएनएएटी, स्पुटम टेस्ट आदी तपासण्या
- पोषण आहार, तपासणी केंद्रांची उभारणी
- खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधून रुग्णसेवा
क्षयरोगमुक्त पिंपरी चिंचवडचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु उपचार नियमितपणे घेणे आणि आवश्यक तपासण्या वेळेवर करून घेणे हे प्रत्येक रुग्णाने पाळणे गरजेचे आहे.
- डॉ.बाळासाहेब होडगर, वरिष्ठ आरोग्य अधिकारी, कुटे रुग्णालय, आकुर्डी
प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त अभियानाची मुदत डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. सध्याला ८७ हजारांहून अधिक नागरिकांचे टीबीसाठी स्क्रिनिंग केले आहे. यातून १८२४ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. टीबीमुक्त मोहिमेचा सकारात्मक परिणाम झाला असून टीबीमुक्त रुग्णांचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. तसेच रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांनाही प्रतिबंधक उपचार दिले जातात. त्यामुळे हे प्रमाण कमी झाले आहे.
- गोविंद नरके, वैद्यकीय अधिकारी, कुटे रुग्णालय, आकुर्डी
मला सतत खोकला होत होता. तपासणी केल्यावर टीबी असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला भीती वाटली. पण, महापालिकेच्या डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मला विनामूल्य औषधे आणि पोषण आहार मिळाला. आता आरोग्यात खूप सुधारणा झाली आहे. या मोहिमेमुळे माझे जीवन परत सामान्य होत आहे.
- संदीप राठोड (नाव बदललेले आहे), रुग्ण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.