पिंपरी-चिंचवड

रावेतमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था

CD

रावेत, ता. ४ : रावेतमधील डीमार्ट चौक आणि डॉ. आंबेडकर चौक परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती अतिशय दयनीय असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्याकडेला खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागले असून दूषित वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
या स्वच्छतागृहात पाण्याची सोय नाही. संपूर्ण जागा घाणीने भरलेली असून मूत्रविसर्जनासाठी असलेली वाहिनी तुटलेली आहे. स्वच्छतागृहांची दारे गायब झाली आहे. सर्वत्र अस्वच्छता पसरली असून असह्य दुर्गंधी पसरली आहे. या स्वच्छतागृहाच्या भिंतींवर साफसफाई, ठेकेदाराचे नाव, शेवटची स्वच्छता कधी झाली ?, तक्रार कुठे नोंदवायची ? याचे माहिती फलक पूर्णपणे रिकामे आहेत. याबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला संपर्क केला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही.


दररोज येथे शेकडो लोक येतात. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे गर्दी होते. पण, स्वच्छतागृहाची अवस्था खराब असल्याने नागरिकांना मोठा त्रास होतो. महापालिकेने तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- केशाराम दाओल, स्थानिक व्यापारी

महिलांसाठी वापरता येईल, असे स्वच्छतागृहच या भागात नाही. दरवाजे नसल्याने महिलांना त्याचा वापर करता येत नाही. मात्र, महापालिका त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे.
- स्वाती अरगडे, नागरिक

आम्ही जवळील महाविद्यालयासाठी रोज या रस्त्याने जातो. चौकात खाण्याचे स्टॉल्स आहेत. पण, इतका वास येतो की थांबणेही कठीण होते. सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे.
- संतोष आबनावे, विद्यार्थी

काय आहेत मागण्या
- महापालिकेकडे तातडीने लक्ष घालावे
- पाणी, स्वच्छता, दरवाजे व आवश्यक सुविधा उपलब्ध द्याव्यात
- स्वच्छतागृहास जबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी
- नियमित साफसफाईचा तपशील लावावा
- तक्रारींसाठी संपर्क क्रमांक द्यावा

NGI25B00905

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

OBC leaders ultimatum : ‘’२ सप्टेंबरचा जीआर रद्द करा, श्वेतपत्रिका काढा’’ ; ओबीसी नेत्यांची सरकारला सहा दिवसांची मुदत!

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

ग्लोबल स्टार राम चरण याच्या हस्ते आर्चरी प्रीमियर लीगचा दणदणीत शुभारंभ

Hill Station Travel Tips: पहिल्यांदाच हिल स्टेशनला जाताय? मग ट्रॅव्हल बॅगमध्ये नक्की पॅक करा 'या' महत्वाच्या वस्तू

SCROLL FOR NEXT