पिंपरी-चिंचवड

ज्योतिबानगर ते सोनवणे वस्ती रस्त्याची दुरवस्था

CD

निगडी, ता. १५ : तळवडे (ज्योतिबानगर) लघुउद्योग परिसरातून सोनवणे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजाग खड्डे पडले आहेत. तसेच कित्येक वर्षे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे त्वरित दुरुस्तीसह या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
तळवडे भागातील लघुउद्योग परिसरातून चिखली सोनवणे वस्ती भागाला जोडणाऱ्या या रस्त्यावर प्रचंड वाहतुकीचा ताण आहे. वाहनांची वर्दळ या रस्त्यावर सतत असते. त्यामुळे दिवसभर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रहिवासी नागरिकांसह दुकानदार यांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो. काही जागेवर मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यातून लहान- मोठे अपघात घडतात. हा रस्ता रुंदीकरणासाठी प्रस्तावित आहे पण काहीही काम झाले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच वाढती लोकवस्ती व उद्योग व्यवसाय यांचे वेगाने वाढणारे प्रमाण लक्षात घेऊन या रस्त्याचे रुंदीकरणासह डांबरीकरण करावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
सध्या धुळीचा अनेकांना मोठा त्रास होत असल्याने श्वसनाचे विकार काहींना जडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. काही ठिकाणी चेंबर फुटले आहेत. त्यामुळे रस्त्यावर पाणी आले आहे.

‘‘धुळीचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. अनेक जण आजारी पडले आहेत. रस्त्यावर पाणी मारत नाही. वाहनांच्या वर्दळीतून पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. डांबरीकरण व रुंदीकरण त्वरित करावे.’’
-मयूर भालेकर, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update :धावत्या ट्रेनमधून वैतरणा नदीत पडला तरुण, सतर्कतेमुळे जीव वाचला

हॉटेलमध्ये चालवलं जायचं सेक्स रॅकेट, ५०० तरुणी, १०० ग्राहक; दलाल २० हजार घेऊन तरुणींना द्यायचे ५ हजार

SCROLL FOR NEXT