निगडी, ता.९ ः जीवाला एकच तहान दिसावे स्वामी गजानन, नाही जगी संत ऐसा गजानना सारखा...यासारख्या एकापेक्षा एक सरस भक्तिरचना सुरेल आवाजात सादर करून प्रसिद्ध ज्येष्ठ गायक पं. अजित कडकडे यांनी रसिकश्रोत्यांना भक्तिरसाचा आनंद दिला.
संत श्री गजानन महाराज १४८ व्या प्रगट दिनाच्या निमित्ताने निगडी येथे श्री गजानन महाराज ट्रस्टच्यावतीने संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये कडकडे यांनी अभंग, भक्ती रचना, गवळणी सादर केल्या.
‘तुम बीन मानत नहीं जिया मोरा’ ही सुंदर रचना सादर करून त्यांनी मैफिलीची सुरुवात केली. ‘नाही जगी संत ऐसा गजानन सारखा’ हे श्री गजानन महाराज यांची महती सांगणारे भजन सादर केले. ‘जीवाला एकच तहान दिसावे स्वामी गजानन’, ‘निःशंक होई रे मना, अशक्य शक्य करतील स्वामी’ ही लोकप्रिय गीत सादर करून सर्व रसिकांना ‘गण गण गणात बोते’, या भजनात सहभागी करून घेतले. त्यानंतर त्यांचे गुरू पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ‘अवघे गर्जे पंढरपूर’ हे भजन सादर केले. ‘असा कसा देवाचा देव बाई ठकडा’ ही संत एकनाथ महाराज यांची गवळण रसिकांच्या मागणीमुळे सादर करून त्यामागील भक्ती उलगडून सांगितली. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ या लोकप्रिय गीतालाही रसिकांनी टाळ्यांची दाद दिली. ‘गुरू परब्रह्म स्वामी गजानन’ हे भजन सादर केले. त्यांना रूपक वझे (तबला), दिनकर भगत (पखवाज), प्रकाश वगल (हार्मोनियम) व किशोर दामाये, मुकुंद भद्रानी यांनी साथसंगत केली. श्री गजानन महाराज ट्रस्टच्यावतीने पं. कडकडे व सहकलाकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या भजन मैफिलीला रसिकांची मोठी गर्दी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.