पिंपरी-चिंचवड

अश्‍लील चाळे अन् तळीरामांचा अड्डा काळेवाडीतील ज्योतिबा उद्यानात ओपन जिमचीही दुरवस्था

CD

काळेवाडी, ता. ७ : येथील ज्योतिबा उद्यानात प्रेमी युगुलांचे अश्‍लील चाळे होत असून, तळीरामांचाही अड्डेही बनले आहेत.
उद्यानातील ओपन जीम व खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने या उद्यानाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिकेने ज्योतिबा उद्यान विकसित केले आहे. पवना नदीकाठी असलेल्या या उद्यानात हिरवीगार झाडी आहे. मात्र, उद्यानात मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. येथे स्केटिंग रिंग बनविण्यात आली आहे. मात्र, तेथे फुटबॉल खेळला जातो. अनेकदा फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना फुटबॉल लागतो. त्यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

दृष्टीक्षेप :
-स्वच्छतागृहात तुटलेले दिवे.
-बंद दिव्यांमुळे उद्यानात अंधार
-तुटलेली खेळणी
-ओपन जीमचे साहित्य तुटलेले
-पिण्याच्या पाण्याचे तुटलेले नळ
-धबधब्याची दुरवस्था
-दिव्यांच्या उघड्या डीपीमुळे अपघाताचा धोका
-सुशोभीकरणासाठी बसविलेली एलईडी कार्बस्टोन लाइट बंद


गैरप्रकारात वाढ
उद्यानाचे मुख्यद्वार बंद असेल तर पवनानगरमधून नदीकाठालगत उद्यानात येण्यासाठी चोर मार्ग आहे. त्यामुळे उद्यानात प्रेमी युगुलांचे अश्‍लील चाळे सुरू असतात. तसेच बंद दिव्यांमुळे उद्यानात अंधार पसरत आहे. त्यामुळे गैरप्रकारही वाढले आहेत. दुपारी व रात्री उद्यान बंद झाल्यानंतर उद्यानात तळीरामांच्या पार्ट्या रंगतात. अनेकदा त्यांच्यात शिवीगाळ व भांडणेही होतात. उद्यान सुरू झाल्यानंतर बाटल्या, गुटखा व सिगारेटची पाकिटे येथे पडलेली दिसतात.

‘‘ओपन जीमवर व्यायाम प्रेमींसह ज्येष्ठ नागरिक कसरत करत असतात. मात्र, अनेक साहित्य तुटले आहे. काही खेळणी तुटली आहेत. त्यामुळे मुलांची कुचंबणा होत आहे. तसेच बंद दिवेही सुरू करणे गरजेचे असून, महापालिकेने तातडीने उद्यानाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- सचिन काळे, सामाजिक कार्यकर्ते
………

फोटो ः 16629, 16632, 16633

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT