Schoool Education Representative Image Sakal Digital
पिंपरी-चिंचवड

अनधिकृत शाळांची 'शाळा' अखेर बंद! पिंपरी-चिंचवडमधील दोन शाळांवर गुन्हा दाखल

शाळा विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क वसुलीही करतात. परंतु, आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत

आशा साळवी

पिंपरी : शहरातील अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीबाबतचे वास्तव ‘सकाळ’ ने मांडले होते. या गंभीर प्रकाराबाबतची ‘अनधिकृत शाळांची शाळा’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत महापालिकेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. चिंचवडमधील लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या दोन अनधिकृत शाळांवर गुन्हा दाखल केला आहे. तर उर्वरित नऊ शाळांवर कधी गुन्हा दाखल होणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच अनधिकृत शाळांवर अशाप्रकारे फौजदारी कारवाई करण्यात आलेली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कित्येक वर्षांपासून अनधिकृत शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. शाळा म्हणजे कमी वेळेत मुबलक पैसा कमविण्याचे साधन बनले आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांनी मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. या शाळा विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क वसुलीही करतात. परंतु, आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. याबाबत शिक्षण विभागाने नोटीस बजावण्याबरोबर प्रथमच गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय थोरात आणि प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या आदेशावरून प्राधिकृत अधिकारी विलास पाटील यांनी अनधिकृत शाळांबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पहिल्या गुन्ह्यात चिंचवड लिंकरोड येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलचे जे. डिकोस्टा (रा. बंगलुरू) आणि समीर गोरडे (रा. विमाननगर, पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये चिंचवडेनगर येथील लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचे श्रेयश कुमार (रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये शिक्षण विभागाचे प्राधिकृत अधिकारी विलास दयाराम पाटील (रा. कृष्णा चौक, नवी सांगवी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींची पूर्तता न करता लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या शाळा सुरू ठेवल्या. तसेच शाळा अधिकृत असल्याचे पालकांना भासवून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत शुल्क वसुल केले. विद्यार्थ्यांचे दाखले व इतर शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन शासन, विद्यार्थी व पालक यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या नऊ शाळांवर कारवाई कधी ?
माउंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल (कासारवाडी), पीपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट (गांधीनगर, पिंपळे निलख), चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल (विशाल नगर, पिंपळे निलख), आयडीएल इंग्लिश स्कूल (जवळकरनगर, पिंपळे गुरव), संपलिंग्स इंग्लिश मीडियम स्कूल (मोशी), नवजीत विद्यालय (लक्ष्मीनगर, वाल्हेकरवाडी), किड्स स्कूल (पिंपळे सौदागर), एम.एस. स्कूल फॉर किड्स (सांगवी), क्रिस्टल मॉडर्न स्कूल (वडमुखवाडी, चऱ्होली) या शाळांही अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. वरील दोन्ही शाळांप्रमाणे उर्वरित नऊ शाळांवर गुन्हे दाखल कधी होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात प्रथमच कारवाई
या अगोदर अनधिकृत शाळांबाबत तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त होत होत्या. यानुसार, शिक्षण विभागाकडून समज देणे, नोटिसा बजावणे आणि कडक कारवाईचा इशारा देणे, अशी दिखाऊ कारवाई होत असे. या वरवरच्या कारवाईला न जुमानता अनधिकृत शाळांचा काळा बाजार सुरूच आहे. दरम्यान या अनधिकृत शाळांच्या राजरोसपणे उद्योगाबाबत ‘सकाळ’ने आवाज उठवला. त्यामुळे, शिक्षण विभागाला संबंधित शाळांवर गंभीर कारवाई करणे भाग पडले. शिक्षण विभागाने सोमवारी (ता. १५) या अनधिकृत शाळांबाबत फिर्याद नोंदवली. त्यानुसार, अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल झाले असून पुणे जिल्ह्यात अशाप्रकारे फौजदारी कारवाई होण्याची पहिलीच घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : मंडणगड साईनगर येथे ‘नाना - नानी पार्क’चे लोकार्पण

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

SCROLL FOR NEXT