पिंपरी-चिंचवड

दापोडीची ग्रामदैवता श्री फिरंगाई देवी

CD

दापोडीचे ग्रामदैवता व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली श्री फिरंगाई देवीचे दापोडी येथे हेमाडपंथी मंदिर आहे. अडीचशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर मुंबई-पुणे मुख्य रस्त्याच्याकडेला आहे. दापोडीकरांच्यावतीने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. या काळात भाविकांची मोठी गर्दी असते.
श्री फिरंगाई देवी मंदिरात शिळारूपी वास करणारी देवीची मूर्ती आहे. पुरातन मंदिर असूनही हे सुस्थितीत जतन करण्यात आले आहे. ही माता भाविकांची इच्छापूर्ती करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पंचक्रोशीत इच्छापूर्ती करणारी देवी अशी तिची ख्याती आहे. कुरकुंभ हे देवीचे मूळ स्थान आहे. हीच देवी फिरत फिरत दापोडीत आली आणि दापोडी गावाची ग्रामदेवता झाली, अशी आख्यायिका आहे. पुणे-मुंबई महामार्गावर आकर्षक घुमट, हेमांडपंथीय बांधकामाची उत्कृष्ट रचना असलेले देवीचे मंदिर आहे. देवीची मूर्ती पंढरपूर येथून तयार करून घेतल्याचे ग्रामस्थ सांगतात. पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीचे पारंपरिक पद्धतीने पूजा बांधून पूजा विधीस सुरूवात करण्यात येते. नऊ दिवस विविध रूपात देवीची पूजा बांधली जाते. दरवर्षी सालाबादप्रमाणे प्रथेनुसार शेवटच्या दिवशी जागरण गोंधळ करण्यात येते. मान्यवरांच्या हस्ते दररोज महाआरतीचा मान दिला जातो. प्रथेप्रमाणे पालखी छबिना मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी असते. उत्सवानंतर ग्रामस्थांच्यावतीने निकाली कुस्त्या, रोख पारितोषिकांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. नामांकित मल्ल त्यात भाग घेण्यासाठी येतात. उत्सवादरम्यान परिसराला जत्रेचे स्वरूप येते. पै-पाहुण्यांची वर्दळ, बाळ-गोपाळांसाठी आनंदमेळा, मनोरंजनात्मक कार्यक्रमात लोकनाट्य तमाशा कलावंतांच्या तमाशाचे आयोजन करण्यात येते.
शब्दांकन ः रमेश मोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: काश्मीरची लेडी सिंघम मैदानात! एन्काऊंटर स्पेशालिस्ट IPS शाहिदा स्फोटाच्या स्थळी दाखल

Tata Safari अन् Harrier फेसलिफ्टची लॉन्च डेट कंफर्म; 'या' दिवशी मार्केटमध्ये पदार्पण करणार दमदार कार, तेही अगदी परवडणाऱ्या दरात

Latest Marathi Breaking News Live : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर

CA After 12th: CA बनण्यासाठी १२वी नंतर काय करावं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

'तुंबाड'नंतर येतोय 'मयसभा'; राही बर्वेचा नवा सिनेमा; फोटोत दिसणारा अभिनेता कोण? कित्येक ओळखू शकले नाही

SCROLL FOR NEXT