जुनी सांगवी, ता.४ ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दापोडी येथील मदरशात हिंदू - मुस्लिम बांधवांनी एकत्र येत अहिंसेचे पालन करण्याची शपथ घेतली. यावेळी मदरशामधील अनाथ मुलांनी सहभाग घेतला. यावेळी मौलाना कारी इकबाल, नजीर मुजावर, संजय कणसे यांनी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अहिंसा गौरव सन्मान देऊन सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. अनाथ मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी गणेश कांबळे, मंजूर शेख, नदीम पठाण, मंगेश मोरे, असिफ मणियार आदी उपस्थित होते. बंटी मुजावर यांनी सूत्रसंचालन केले; तर देवेंद्रसिंग यादव यांनी आभार मानले.