जुनी सांगवी, ता.९ ः पिंपळे निलख येथील समस्थ ग्रामस्थांच्या देणगीमधून श्री भैरवनाथ जोगेश्वरी व विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची भक्तिमय वातावरणात नुकतीच प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
समस्त पिंपळे निलख ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिर परिसराला सुंदर फुलांनी सजावट, रोषणाई आणि भगव्या झेंड्यांनी सजविण्यात आले. सकाळपासूनच परिसरात भक्तांची गर्दी उसळली. ढोल-ताशांच्या गजरात, हरिनामाच्या घोषात पालखी मिरवणुकीने मूर्ती मंदिरात आणण्यात आल्या. त्यानंतर पूजा, होम हवन करुन कीर्तनकार गणेश महाराज कार्ले यांच्या हस्ते मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
सोहळ्याच्या निमित्ताने दोन दिवस कीर्तन, भजन, नामस्मरण आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. नामस्मरणाच्या गजरात भक्तगण मंत्रमुग्ध झाले. सायंकाळी गणेश महाराज कार्ले यांचे कीर्तन झाले. त्यांनी संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत संत परंपरेतील ज्ञान आणि भक्ती यांचा संगम उलगडून सांगितला. त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांद्वारे समाजातील ऐक्य, प्रेम आणि आत्मचिंतनाचा संदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी महिला भजनी मंडळांनी अभंग गायन सादर करून व भक्तिगीतांनी वातावरण भारावून टाकले. या कार्यक्रमामुळे गावात धार्मिक आणि सांस्कृतिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. प्राणप्रतिष्ठापना विधी पार पडल्यानंतर महाआरती झाली. त्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
सुरेश साठे, नितीन इंगवले, माऊली मुरकुटे, विजय इंगवले, राजू पांचाळ, नाना सदासकाळ, पांडुरंग इंगवले, राजू पुजारी, महादेव इंगवले, संतोष साठे आदींनी सोहळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
PIM25B20464
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.