पिंपरी-चिंचवड

जुनी सांगवीत काकड आरती सांगता सोहळा उत्साहात

CD

जुनी सांगवी, ता. १० ः मारुती मंदिर ट्रस्ट व समस्त सांगवी ग्रामस्थांच्यावतीने आयोजित कार्तिक स्नान काकड आरती सांगता सोहळा उत्साहात झाला. प्रसिद्ध कीर्तनकार हभप माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांनी काल्याच्या कीर्तनात देव आणि भक्तांचे नाते सहज सोप्या पद्धतीने उलगडून सांगितले.
मारुती मंदिरात वरील सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्ताने सकाळी ८ वा. दिंडी प्रदक्षिणा, कीर्तन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आप्पा बागल, अरूण पवार, बब्रुवाहन वाघ महाराज, अरूण शिंदे, सुदाम महाराज फुगे, काळुराम महाराज इंगवले, सुरेश काटे, शिवाजीराव काटे आदी उपस्थित होते.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगावर आधारित कीर्तनात खरा आनंद आणि समाधान हे सांसारिक सुखात नसून ईश्वराच्या संगतीत आहे. ज्याला भक्तिभावाने आत्मसात केले. त्याला जीवनातील सर्व भोगांपासून निश्चिंती लाभते, असे त्यांनी नमूद केले. अशोक ढोरे पाटील, सतपाल ढोरे, मनोहर ढोरे, कुमार ढोरे, बाळासाहेब शितोळे, सूर्यकांत ढोरे, गौरव ढोरे, आदित्य ढोरे आदींनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मिटकरी, ठोंबरेंची हकालपट्टी! यापूर्वीच्या सर्व नियुक्त्या रद्द; चाकणकरांसह 'हे' असतील नवे प्रवक्ते

Latest Marathi Breaking News: चारकोप विधानसभा: गुजराती, बंगाली, ओडिया, भाषेत मतदारांची नावे

Mumbai Crime: १५ वर्षांची मुलगी काका म्हणायची, तिच्यावर ५९ वर्षीय निवृत्त जवानाने केले अत्याचार; पीडिता गर्भवती

Parth Pawar: ''48 तासांमध्ये पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, नाहीतर..'' अंजली दमानियांचा इशारा

बापरे! धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली, ब्रीच कॅन्डी रुग्णालयात व्हेटिंलेटरवर

SCROLL FOR NEXT