पिंपरी, ता. २९ : इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘ये दिल हैं हिंदुस्थानी या देशभक्तिपर गीतांच्या नि:शुल्क सांगीतिक मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध झाले. राखी झोपे यांच्या संकल्पनेतून आणि अनिल झोपे यांच्या संयोजनातून ‘गाता रहे मेरा दिल’ या उपक्रमांतर्गत ही ४५वी विशेष सांगीतिक मैफल सादर करण्यात आली.
या कार्यक्रमात राजकुमार सुंठवाल, प्रमोद शर्मा, गणेश ओहाळ, सागर पाटील, शहाजी कांबळे, मंगेश उंबराणी, अमित पांचाळ, नीलेश मोरे, दत्तात्रय कुंभार, कविता शाह, माधवी पोतदार, रूपाली मिरासदार, प्रशांत कुलकर्णी आणि दीपा कोंडलेकर या कलाकारांनी एकाहून एक सुरेल गीतांचे सादरीकरण केले. बहुतांश गीतांना दमदार कोरसची प्रभावी स्वरसाथ लाभल्याने मैफलीची रंगत आणखी वाढली.
‘संदेसे आते हैं,’ ‘जहाँ डाल डाल पें,’ ‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी,’ ‘मेरा जुता हैं जपानी,’ ‘मेरे प्यारे वतन,’ ‘कितना सोणा हैं देश मेरा,’ ‘भारत हमको जानसे प्यारा हैं,’ ‘हर करम अपना करेंगे,’ ‘ये देश हैं वीर जवानोंका,’ ‘मेरे देश की धरती,’ ‘इन्साफ की डगरपें,’ ‘मेरे देशप्रेमीयों,’ ‘ए मेरे वतन के लोगों,’ ‘छोडो कल की बातें,’ ‘कर चले हम फिदा,’ ‘देश रंगीला...,’ ‘हैं प्रीत जहाँ की रीत सदा...,’ ‘दुल्हन चली’ अशा वैविध्यपूर्ण देशभक्तिपर गीतांना भरभरून दाद देताना श्रोते टाळ्यांसह ‘भारतमाता की जय!’ असा जयघोष करीत होते. ‘ने मजसी ने मजला...’ आणि ‘शूर आम्ही सरदार...’ या मराठमोळ्या गीतांनी श्रोत्यांना सद्गदित केले. ‘जिंदगी मौत ना बन जाये...’ या गीताने मैफलीचा समारोप करण्यात आला; तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.